निवती बंदर येथील महाविष्णु मंदिराचा वर्धापन दिन सोहळा.
निवती बंदर येथील महाविष्णु मंदिराचा वर्धापन दिन सोहळा.
२४ ते २६ मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी : निवती बंदर येथील श्री महाविष्णु मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त २४ ते २६ मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ मार्च रोजी सकाळी ८ वा. हरिपाठ, सायंकाळी ५ वा. ग्रामस्थांची भजने, ६ वा. श्री पावणादेवी समईनृत्य किंजवडे यांचे समई नृत्य , रात्री ९ वा. महापुरुष महिला भजनमंडळ तारकर्ली यांचे भजन. बुधवार, २५ मार्च रोजी पहाटे ५ ते ६ श्री देव महाविष्णु अभ्यंग स्नान, लघुरुद्र, अभिषेक व यथासांग पूजन, भाविकांसाठी श्रींचे दर्शन, १० वा. हरिपाठ, दुपारी २ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सायं. ६ ते ८ ग्रामस्थांची भजने, रात्रौ ९ वा. जयहनुमान दशावतार नाट्यमंडळ मोचेमाड यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, दुपारी ११:३० वा. ग्रामस्थ भजन, १२ वा. रामजन्म आरती, १२:३० वा. महाप्रसाद, सायं. ५ वा. हरिपाठ, ७ वा. श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, किर्लोस यांचे दिंडी भजन, रात्रौ ९ वा. सातेरी महिला दशावतार मंडळ पावशी, कुडाळ यांचा 'भक्तांची पाठिराखी आदिमाया' दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
विष्णुमंदिर समितीने उपस्थितीचे आवाहन केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मो...
श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथील श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर.
रुजारिओ पिंटो यांच्या 'माॅं मेरी' हिंदी काव्यसंग्रहाचा १५ ऑगस्टला प्रकाशन सोहळा.
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.