ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुडाळ शहर शिवसेनेच्या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनपर मनोगत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुडाळ शहर शिवसेनेच्या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनपर मनोगत.

खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुडाळ शहर शिवसेनेच्या उपक्रमाला जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनपर मनोगत.

Article image


शहरप्रमुख अभिषेक गावडे व त्यांच्या सोबत्यांच्या संघटनात्मक सेवाव्रताची प्रशंसा.



कुडाळ | ब्यूरो न्यूज : लोकनेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त, यंदा विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अंतर्गत आज २१ जून २०२६ रोजी, कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सेवा बजावणाऱ्या रिक्षा व्यवसायिक, बांधकाम कामगार, दिव्यांग, निराधार महिलांचा सन्मान करून मोफत छत्री वाटप कार्यक्रम येथे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, ओंकार तेली, तालुकाप्रमुख दीपक नारकर, सभापती मिलिंद नाईक, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, शहर प्रमुख अभिषेक गावडे, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, आफरीन करोल, चांदणी कांबळी, गणेश भोगटे, युवा सेना शहर प्रमुख आबा धडाम, माजी नगरसेविका प्रज्ञा राणे, साक्षी सावंत, रेवती राणे, चर्मकार संघाचे पंढरीनाथ चव्हाण, श्रमिक कामगार संघाचे संस्थापक प्राजक्त चव्हाण, राकेश नेमळेकर, प्रथमेश केळबाईकर, प्रथमेश कांबळी, चंदन कांबळी, योगेश काळप, राजाराम गडेकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मार्गदर्शनपर संबोधन करताना सांगितले की, कुडाळ शहर प्रमुख पद अभिषेक गावडे यांना दिल्यापासून शहरांमध्ये संघटना बांधण्याचे काम त्यांनी जोरदार सुरू केले आहे. विविध घटकांचे कार्यक्रम त्यांनी घेऊन या घटकांना संघटनेशी जोडण्याचे काम केले आहे. आपल्याजवळ एखादी गोष्ट असेल तर ती गोष्ट दुसऱ्याला देण्याची भावना मनात असावी लागते. नेहमी लोकांना मदत करत राहणारा माणूस कधीच लोकांच्या मनातून उतरत नाही. महिला बचत गटांचा कार्यक्रम तसेच आता घेतलेला गुणवंत विद्यार्थ्यांसह रिक्षा व्यवसायिक, बांधकाम कामगार, दिव्यांग, निराधार महिलांचा सन्मान हे सगळे कार्यक्रम जनतेशी निगडित आहेत. त्याच्यासोबत असलेले सोबती सुद्धा त्याच्या या कार्यामध्ये हातभार लावत आहे. हे कौतुकास्पद आहे. संघटना बांधण्यासाठी ही मंडळी काम करत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Article image


या कार्यक्रमांमध्ये श्रीदेवी केळबाई मित्र मंडळाचा विशेष सत्कार करण्यात आला हे मंडळ ज्या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्याची सेवा करायची असेल त्या ठिकाणी हे मंडळ मोफत नि:स्वार्थ भावनेने सेवा करत असतात या पार्श्वभूमीवर या मंडळाचा सत्कार करण्यात आला. पंढरपूर येथे रथाचे काम करणारे सिद्धेश नाईक, कट्टर राणे समर्थक माजी उपसरपंच विलास वराडकर, ४२ वेळा रक्तदान करणारे रिक्षा व्यावसायिक अविनाश पाटील यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले. चांदणी कांबळी यांनी आभार प्रदर्शन केले.


सौजन्य | कुडाळ ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 441

लोकप्रिय टॅग्स