ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' करायचा सांस्कृतिक जागृतीपर इशारा दिलेला होता...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' करायचा सांस्कृतिक जागृतीपर इशारा दिलेला होता...!

आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' करायचा सांस्कृतिक जागृतीपर इशारा दिलेला होता...!

Article image


'स्टॅन्ड अप काॅमेडिअन'ची अभिव्यक्ती ही सांस्कृतिक व सर्वांगीण सक्षमीकरणाचे माध्यम बनवायचे उद्योजक दत्ता सामंत यांचे आवाहन.



मालवण : डिजीटल सामाजिक माध्यमातून 'स्टॅन्ड अप काॅमेडिअन'चा एक 'नकोसा' संवाद हा सध्या चर्चेसोबत टीकेचा विषय आहे. याबाबत जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी, वर्षभरापूर्वी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी 'स्टॅन्ड अप काॅमेडिअन्सना' चौकटीत राहून, योग्य शब्द व आस्था जपून सादरीकरण करायचा एक 'सांस्कृतिक मार्गदर्शनपर इशारा' दिला होता याची आठवण करुन दिली.


जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांनी कोकणाला व महाराष्ट्राला तसेच देशाला निखळ विनोदाचार्यांचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे असे स्पष्ट करताना वस्त्रहरणकार बाबुजी उर्फ मच्छिंद्र कांबळी यांचे नर्मविनोद आणि मार्मिक स्वर कधीच कोणाला न दुखावता, आजही अंतर्मुख करायला लावतात असे स्पष्ट केले. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांच्या विविध सादरीकरणांच्या ध्वनीफिती ह्या निखळ विनोद व शाश्वत आनंदाची माध्यमे म्हणून गणली जातात असेही दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.


प्रसंगी व्यवस्थेच्या विरुद्ध देखिल अत्यंत सुव्यवस्थितपणाने संहिता लिहून, संसदीय शब्दात सादरीकरण करत मने जिंकलेले दिवंगत जसपाल भट्टी यांच्यासारखे विनोदवीर हे देशाच्या 'स्टॅन्ड अप काॅमेडिअन' मांदियाळीत आहेत. आपल्याला व खासकरुन कोकण आणि महाराष्ट्रातील 'स्टॅन्ड अप काॅमेडिअन' कलावंतांकडे आपसुकच जन भावनेचा आदर करणारी एक सूज्ञता असते. गेल्या काही वर्षात काही सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण व महाराष्ट्रातून विनोदाचे अनेक उत्तम सादरकर्ते जनतेसमोर येत आहेत हे स्वागतार्ह आहे असेही दत्ता सामंत यांनी आवर्जून सांगितले. 'स्टॅन्ड अप काॅमेडिअन्स'ची अभिव्यक्ती ही सांस्कृतिक व सर्वांगीण सक्षमीकरणाचे माध्यम बनवायचे आवाहन देखिल उद्योजक दत्ता सामंत यांनी केले आहे. 


कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी एक वर्षापूर्वी दिलेला इशारा हा त्यांचे एक सर्वांगीण काळजी जपणारे नेतृत्व व त्यांचे 'व्हीजन' किती दूरपर्यंतचे असते याची चुणूक दाखवतो असेही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स