ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

Article image


कुडाळ | देवेंद्र गावडे : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


       

यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवार दि. २१ मार्च रोजी सायं ७ वाजता मांडकुली येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आणि मंगळवार दि. २४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. 


   

बुधवार दि. २५ मार्च रोजी सकाळी १०.३० वा. युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील रिक्षा सेनेच्या चालकांचा एक लाखाचा विमा उतरविण्यात येणार असून जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. बुधवार दि. २५ मार्च रोजी मालवण शहर शिवसेनेच्या वतीने मालवण शहर येथे सायं ६ वाजता नेरूर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


    

आचरा शिवसेना विभागामार्फ़त बुधवार दि. २५ मार्च रोजी चिंदर सातेरी मंदिर येथे सायं. ८ वा. आचरा विभागातील जेष्ठ नागरीकांचा व चिंदर गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि बारापाच मानकऱ्यांचा सत्कार समारंभ व रात्रौ ९ वा. शिवसेना उपतालुकाप्रमुख पप्पू परुळेकर पुरस्कृत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. 


     

गुरुवार २६ मार्च रोजी माणगाव शिवसेनेच्या वतीने रामनवमी व वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दत्तमंदिर येथे सरबत वाटप करण्यात येणार आहे. तसेच ओरोस शिवसेना विभागाच्या वतीने अणाव येथील आनंदाश्रय येथे शिधा वाटप आणि झाराप शिवसेनेच्या वतीने सकाळी १० वाजता जीवदान विशेष शाळा झाराप येथे विद्यार्थ्यांना शिधा आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स