ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मालवणात स्वर्गीय राजनभाई आंगणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणात स्वर्गीय राजनभाई आंगणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू.

मालवणात स्वर्गीय राजनभाई आंगणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू. 

Article image

Article image


द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक दिनेश लाड, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर व मान्यवरांची उपस्थिती.

Article image


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर १९ मार्च २०२६ ला एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे स्मृती चषकाचे दुसरे पर्व सुरू झाले. या स्पर्धेत ६ संघ सहभागी झाले आहेत.

Article image

Article image


१६ वर्षांखालील ह्या स्पर्धेच्या उद्घाटनाला द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक दिनेश लाड, एम. क्रिकेट ॲकॅडमी अध्यक्ष उदय नाईक व मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजकांच्या वतीने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक श्री दिनेश लाड, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर व विविध मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक श्री दिनेश लाड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी दिनेश लाड, दीपक पाटकर, मालवणचे माजी खेळाडू सुरेल उर्फ पप्पू परब, एम. ॲकॅडमी मुख्य प्रशिक्षक राहुल रेगे, मालवणचे माजी नगराध्यक्ष तसेच माजी खेळाडू व विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर, उद्योजक परशुराम पाटकर, माजी नगरसेवक व उद्योजक जाॅन नर्होन्हा, मडगाव येथील ऑक्स्फर्ड क्रिकेट ॲकॅडमी प्रशिक्षक संदीप नाईक, मालवणचे माजी खेळाडू सुयोग पंडित, रत्नागिरी येथील केतन सावंत, पंच गोविंद उर्फ बंटी केरकर, पंच ॲम्रोज आल्मेडा, गुणलेखक ज्ञानेश केळुसकर, ॲड. सहिष्णू पंडित, माजी खेळाडू दीपक धुरी आणि एम. क्रिकेट ॲकॅडमीचे पदाधिकारी व मान्यवर, खेळाडू, खेळाडूंचे पालक, लेदरबाॅल क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

Article image

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक श्री. दिनेश लाड ( मुंबई )


यावेळी प्रमुख पाहुणे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक श्री. दिनेश लाड यांनी युवा खेळाडू व पालक ह्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले आणि मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड मैदानाची प्रशंसा केली. आगामी काळात ह्या मैदानावर मुलांना प्रशिक्षण द्यायला ते उत्सुक असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. स्वर्गीय राजनभाई आंगणे ह्यांच्या आग्रहामुळे आपण द्रोणाचार्य पुरस्कारासाठी अर्ज केला होता असे सांगत त्यांनी स्वर्गीय राजनभाई आंगणे ह्यांच्या स्मृतींना विशेष वंदन केले.

Article image

श्री. दीपक पाटकर ( उपनगराध्यक्ष, मालवण)

Article image



उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी खेळाडू व आयोजकांना विशेष शुभेच्छा दिल्या आणि अशा उपक्रमांना नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रोत्साहनपर सहकार्य केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्वर्गीय राजनभाई आंगणे ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ह्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल एम. क्रिकेट ॲकॅडमीचे पदाधिकारी, सदस्य व स्पर्धेतील सहभागींची प्रशंसा केली.


यावेळी मडगाव येथील ऑक्स्फर्ड क्रिकेट ॲकॅडमी प्रशिक्षक संदीप नाईक उपस्थित युवा क्रिकेटपटूंसाठी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक श्री दिनेश लाड यांचे मालवणमध्ये गुढीपाडव्याच्या मंगल दिवशी उपस्थित असणे भाग्याचे आहे असे सांगत आयोजकांचे व टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड संबंधित सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


यावेळी प्रमुख पाहुणे दिनेश लाड, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, उदय नाईक, सुरेल उर्फ पप्पू परब व मान्यवरांच्या उपस्थितीत खेळपट्टीवर श्रीफळ वाढवून प्रत्यक्ष पहिल्या सामन्याचा व स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

Article image


या स्पर्धेत एम. क्रिकेट ॲकॅडमी (सावंतवाडी), पनवेल क्रिकेट स्पोर्टस् ॲकॅडमी (पनवेल), वेद स्पोर्टस् ॲकॅडमी (गडहिंग्लज, कोल्हापूर), मिलेनिअम क्रिकेट ॲकॅडमी( सांगली), ऑक्स्फर्ड क्रिकेट क्लब ॲन्ड ॲकॅडमी( गोवा), सावंतवाडी इलेवन ( सावंतवाडी) यांचे १६ वर्षांखालील संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा २ एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स