ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून २ कोटी ७० लाख निधी मंजूर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून २ कोटी ७० लाख निधी मंजूर.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून २ कोटी ७० लाख निधी मंजूर.

Article image

मालवण - कुडाळ तालुक्यात समाज मंदिर इमारत बांधकाम व अंतर्गत सुविधा निर्मिती होणार.


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची ६ ठिकाणी विकास निधी मंजूर झाल्याची माहिती. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण - कुडाळ तालुक्यातील १६ ठिकाणी समाजमंदिर इमारत बांधकाम व अंतर्गत सुविधा निर्माण करणे यासाठी सुमारे २ कोटी ७० लाख निधी, आमदार निलेश राणे यांच्या मागणी पाठपुराव्यातून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.


विकासनिधी मंजुरीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहेत. 


मंजूर कामांमध्ये किर्लोस चव्हाणवाडी समाजमंदिर इमारत बांधकाम करणे. ता. मालवण २० लक्ष, कुणकवळे बौद्धवाडी समाज मंदिर येथे अंतर्गत सुविधा निर्माण करणे. ता. मालवण १० लक्ष, सुकळवाड पाताडेवाडी समाजमंदिर येथे अंतर्गत सुविधा निर्माण करणे. ता. मालवण १० लक्ष, डिगस येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, सिंधुदुर्गनगरी ओरोस बौध्दवाडी येथे समाज मंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, बाव आंबेडकरनगर येथे समाज मंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, केरवडे तर्फ माणगाव येथे समाज मंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, आंब्रड तांबेवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, नारूर हरिजनवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, वेताळ बांबर्डे कपिल नगर समाज मंदिर विस्तारीकरण व अंतर्गत सुविधा निर्माण करणे. ता. कुडाळ १० लक्ष, असगणी बौद्धवाडी येथे २ सोलर हायमास्ट उभारणे. ता. मालवण १० लक्ष, कांदळगाव बौद्धवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण २० लक्ष, ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर रमाईनगर मागासवर्गीय वस्ती मध्ये २ सोलर हायमास्ट बसविणे. ता. मालवण १० लक्ष, ओवळीये बौद्धवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण २०, वायंगणी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण २०, वडाचापाट येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण २० लक्ष असा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण २ कोटी ७० लक्ष निधी मंजूर झाला आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चि...

29 Sep 2026 201

लोकप्रिय टॅग्स