ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या निशांत करंदीकरचा पदकांचा चौकार...! (क्रिडावृत्त)

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या निशांत करंदीकरचा पदकांचा चौकार...! (क्रिडावृत्त)

प्रकाशन: 02 Nov 2021 01:20 PM
वाचन संख्या 74

पाचव्या दक्षिण आशियाई जिमनॅस्टीक स्पर्धा

मूळ चिपळुणचा निशांत “विन दा” करंदीकर ठरला सुपर मेडलिस्ट…!

मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : बांगलादेश येथे नुकत्याच पार पडलेल्या पाचव्या मध्य-आशियाई जिमनॅस्टीक स्पर्धेत मूळ चिपळूण येथील जिमनॅस्ट निशांत करंदीकरने दोन रौप्य पदकासह चार पदके प्राप्त केली आहेत. तसेच याच स्पर्धेत मुंबईच्या आयुष खामकरने दोन पदके जिंकून यश संपादन केले आहे. निशांत करंदीकर हा खेळाडू विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचा विद्यार्थी आहे. निशांत करंदीकरने पॅरलल ब्रास प्रकारात वैयक्तिक तसेच सांघिक रौप्य पदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे रोम रिंग्ज प्रकारात वैयक्तिक सर्वांगिण क्रमवारीत तिसरे स्थान मिळवून ब्राँझ पदक प्राप्त केले आहे. आयुषने पॅरलल बार्स तसेच टेबल व्हाॅल्टमध्ये वैयक्तिक ब्राँझ पदक जिंकले आहे.
जिमनॅस्ट निशांत करंदीकरला निष्णात प्रशिक्षक शुभम गिरी यांचे सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे तसेच इतरही प्रशिक्षक यांचे सुयोग्य मार्गदर्शन व प्रेरणादायी सहकार्य खेळाडूना वेळोवेळी मिळत असते. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे प्रशिक्षक व पदाधिकारी यांच्या कौतुकास्पद प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे अनेक खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात विजय संपादन करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स