मालवणातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची रूपरेषा व समाविष्ट 'विशेष आकर्षणांची' घोषणा.
मालवणातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची रूपरेषा व समाविष्ट 'विशेष आकर्षणांची' घोषणा.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने संयोजक अमित खोत व संकल्पक भाऊ सामंत यांचे यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : घोडे, चित्ररथ, देखावे, कोल्हापूर येथील मर्दानी खेळ, नेरूर येथील शिमगोत्सव, विविध वेशभूषा यांसह ढोल ताश्याच्या गजरात भगव्या उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने १९ मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी ५ वा. मालवण बाजारपेठ मार्गांवरून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. यावर्षी स्वागत यात्रेचे २३ वे वर्ष आहे. दर वर्षी प्रमाणे हिंदूप्रेमी व मालवणवासीय यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्यदिव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे.
दरम्यान, सायंकाळी ७. ३० वा. फोवकांडा पिंपळ मालवण येथे कोल्हापूर करवीर येथील मर्दानी खेळ व नेरूर येथील शिमगोत्सव सोहळ्याचे भव्य सादरीकरण होणार आहे. नेत्रदीपक असा हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
वेशभूषा स्पर्धा
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निमित्ताने याही वर्षी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बालवाडी ते चौथी, पाचवी ते दहावी असे बाल गट व शालेय गट असणार आहेत. तर खुल्या गटात पुरुष व महिला असे दोन गट (पारंपरिक वेशभूषा) असणार आहेत. चार गटात ही स्पर्धा होणार असून प्रत्येक गटातील विजेत्या पाच स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
स्पर्धकांची भरड दत्त मंदिर येथे स्वागत यात्रे पूर्वी सायंकाळी ४ ते ५ यां वेळेत उपस्थित राहून नाव नोंदणी करावी आणि अधिक माहितीसाठी अमिता निवेकर : 9923921507, बंटी केनवडेकर मोबा : 9422596682, अनिकेत फाटक : 9421646390,
यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संयोजक अमित खोत व भाऊ सामंत यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंताना सरकार दरबारी न्याय मिळवून दिल्याची दशावतार कलावंतांची प्रतिक्रिया.
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंता...
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.