ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
वायंगणी येथे २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

वायंगणी येथे २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा.

वायंगणी येथे २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा.   


Article image

              



मसुरे | प्रतिनिधी : वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त २० मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५ वाजता दुग्ध अभिषेक, सकाळी ७.३० वाजता नित्य आरती, सकाळी ९.०० वाजता अभिषेक, सकाळी ११.०० ते सायं. ६.०० पर्यंत स्थानिकांची भजने, दुपारी १२.३० वाजता महाआरती, दुपारी १.०० वाजता महाप्रसाद, रात्रौ ८.०० वाजता श्री आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावठणवाडी यांचे ट्रिकसीन युक्त, भक्तीमय दिंडीनृत्य सादर होणार आहे. बुवा भाई तावडे, पख़वाज वादक प्रथमेश तावडे, तबला वादक तेजस घाडी यांची साथ मिळणार आहे. 


या सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी अध्यक्ष दिपक सुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर, सरचिटणीस सुनील खरात, उपाध्यक्ष दिनेश साळकर, चिटणीस कल्याण साळकर, खजिनदार प्रफुल्ल माळकर, सदस्य रामदास प्रभू, पंडित खोत, शसुधीर घारे, सविता राणे यांनी केले आहे. ज्या स्वामी भक्तांना महाप्रसाद सेवेत वस्तू किंवा देणगी स्वरुपात सहभागी व्हायचे असेल त्यांनी श्री. रुपेश राणे (9511827951) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स