ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवण ग्रामीण रुग्णालयात 'आयुष आरोग्य शिबिर' संपन्न.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण ग्रामीण रुग्णालयात 'आयुष आरोग्य शिबिर' संपन्न.

प्रकाशन: 16 Mar 2026 11:28 PM
वाचन संख्या 54

मालवण ग्रामीण रुग्णालयात 'आयुष आरोग्य शिबिर' संपन्न. 

Article image

मालवण | ब्यूरो न्यूज : नॅशनल आयुष मिशन अंतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालय येथील आयुष कक्षामार्फत सोमवार, १६ मार्च रोजी आयुष आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध आजारांबाबत रुग्णांची तपासणी करण्यात आली.


या शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते झाले. शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील आयुर्वेद तज्ञ डॉ. योगेश गोडकर आणि होमिओपॅथी तज्ञ डॉ. राजेश पालव यांनी उपस्थित राहून रुग्णांना मार्गदर्शन व उपचार सेवा दिली. 


शिबिरात संधिवात, सांधे व गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, त्वचारोग (खाज, खुजली, एक्झिमा), पचनाचे त्रास (अम्लपित्त, बद्धकोष्ठता), तसेच श्वसनाचे आजार (दमा, सर्दी, खोकला) यांसारख्या आजारांवर मोफत आयुर्वेदिक व होमिओपॅथी तपासणी करुन औषधांचे वितरण करण्यात आले. याशिवाय मधुमेह व उच्च रक्तदाबाबाबत मार्गदर्शन देण्यात आले. तसेच स्त्रीरोग व बालरोग संदर्भातही रुग्णांना सल्ला व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती मिळत आहे. 


वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांनी शिबिर यशस्वीतेसाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानले.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स