ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक संपन्न.

प्रकाशन: 16 Mar 2026 10:18 PM
वाचन संख्या 176

जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक संपन्न.

Article image


जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत आगामी सण - उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा - सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि नागरिकांची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा.

Article image


जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे मार्गदर्शन. 

Article image


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी सण - उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात संपन्न व्हावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी सण - उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा - सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि नागरिकांची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 


या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यात येणारे सण - उत्सव हे सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन आनंदाने साजरे करण्याची परंपरा आहे. या काळात जिल्ह्यात सलोख्याचे आणि शांततेचे वातावरण टिकून राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्व समाजघटकांमध्ये संवाद वाढणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच शांतता आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण राहिले असून प्रशासनाला सर्व बांधवांचे सहकार्य मिळत आले आहे. आगामी सण - उत्सवांच्या काळात नागरिकांनी संयम आणि जबाबदारीची भूमिका घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनीही यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सण - उत्सवाच्या काळात सर्वांनी सामाजिक एकोपा जपणे अत्यंत गरजेचे आहे. समाज माध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अशा प्रकारच्या अफवा पसरू नयेत यासाठी नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांनीही आपापली मते मांडली. समाजात शांततेचे वातावरण कायम राखण्यासाठी तसेच सण - उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावरही चर्चा झाली.

Article image


बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस विभागाचे अधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स