ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात शिवसेनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात शिवसेनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात शिवसेनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 

Article image

शिवसेना मालवणच्या वतीने आयोजित उपक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते व वैद्यकीय अधिकारी उपस्थित.

Article image



मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या यांच्या १७ मार्च रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त,  १६ मार्च २०२६ रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, शिवसेना शहरप्रमुख व उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, जिल्हा संघटक नगरसेवक महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती व नगरसेवक सहदेव बापार्डेकर, पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

Article image 

Article image

यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती नगरसेवक सहदेव बापार्डेकर, नगरसेविका व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका मेघा गावकर सावंत, नगरसेविका अश्विनी कांदळकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, मालवण पंचायत समिती उपसभापती श्याम झाड, देवली सरपंच श्याम वाक्कर, पदाधिकारी भाई मांजरेकर, ज्येष्ठ उद्योजक - व्यावसायिक व व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, शहर संघटक राजू बिडये, अभय कदम, उद्योजक परशुराम पाटकर, राजा गावकर, विश्वास गांवकर, बाळू नाटेकर, महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, महिमा मयेकर, प्रसाद आडवणकर, यशवंत गावकर, उद्योजक सूर्यकांत फणसेकर, उद्योजक शेखर गाड, महेश सारंग, उद्योजक मोहन वराडकर, आनंद खवणेकर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते. 

Article imageArticle image


यावेळी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती ठोंबरे यांसह निता आरोलकर, भूषण मळेकर, पवन हराळे, कांचन परब, नितेश पाटील, प्रथमेश घाडी, सचिन बिले आणि नितीन गावकर यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. 

Article image



यावेळी पंकज आंगणे, भाई मांजरेकर, बाळकृष्ण नाटेकर, स्नेहा घाडीगावकर, रत्नकांत गावकर, अनिकेत फाटक, निषय पालेकर, बबन शिंदे, विहार कोदे, किसन मांजरेकर, रामकृष्ण शिंदे, अमित खोत, श्रेया मांजरेकर, सागर मांजरेकर, कृपाल वालावलकर, लक्ष्मीकांत पराडकर, नितेश पेडणेकर, मंदार गावकर, समिधा म्हाडदळकर, गोविंद गोसावी, चिन्मय ढोलम, तेजस लुडबे, शांताराम चव्हाण, श्रीकृष्ण खोत, रोहित पटेल, आशुतोष मंत्री, रामचंद्र तळाशिलकर, भूषण साटम यांच्यासह ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सहभागी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स