ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
जागतिक महिला दिनानिमित्त देवलीत वेशभूषा आणि नृत्य स्पर्धा उत्साहात.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

जागतिक महिला दिनानिमित्त देवलीत वेशभूषा आणि नृत्य स्पर्धा उत्साहात.

जागतिक महिला दिनानिमित्त देवलीत वेशभूषा आणि नृत्य स्पर्धा उत्साहात.


Article image


मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत देवली आणि देवलीला ग्रामसंघ, वरची देवली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त १५ मार्च २०२६ रोजी विविध स्पर्धा संपन्न झाल्या. 'रूटीन लाइफमधून बाहेर पडून साजरा करूया एक उनाड दिवस ‘ती’ चा...' अशी यंदाच्या या उपक्रमाची संकल्पना होती. वरची देवली येथील मधल्या वाड्यातील प्रिया नरेश चव्हाण यांच्या निवासस्थानच्या अंगणात हा विविध स्पर्धांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून मालवणी मालिका, नाट्य व सिने अभिनेत्री नमिता गावकर तसेच नृत्यांगना व आहार तज्ञ डॉ. गार्गी ओरसकर उपस्थित होत्या. 

Article image

Article image

नमिता गांवकर ( सिने व नाट्य अभिनेत्री )


Article image

डॉ. गार्गी ओरसकर ( नृत्यांगना व आहार तज्ञ)


प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. बक्षीस समारंभाच्या प्रारंभी देवलीला ग्रामसंघ आणि नवागर वाडितील बचत गट सदस्यांनी स्वागतगीते सादर केली.


वेशभूषा स्पर्धेतील स्पर्धकांची प्रशंसा करताना नमिता गावकर यांनी सादरीकरण करताना संवाद, हावभाव आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले. पात्र साकारताना त्यामागील संकल्पना समजून घेतल्यास सादरीकरण अधिक प्रभावी होते, असाही त्यांनी विशेष सल्ला दिला 


समूह नृत्य स्पर्धेबाबत मार्गदर्शन करताना डॉ. गार्गी ओरोस्कर यांनी नृत्य करताना शारीरिक संतुलन, नियमित सराव आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहून वेळेवर आहार घेणे व पुरेशी झोप घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. देवली गावात सातत्याने होत असलेल्या विविध उपक्रमांचीही त्यांनी प्रशंसा केली. 


या स्पर्धांमध्ये विविध वयोगटांतील पन्नासहून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.


स्पर्धांचे निकाल :

वेशभूषा स्पर्धा – निकाल :

लहान गट (१ ते ७ वर्षे) : प्रथम – आदिश्री नाईक, द्वितीय – श्रीशा चव्हाण, तृतीय – तस्मय गोवेकर, उत्तेजनार्थ – वैदेही धुरी, गीतांश गोवेकर.


मध्यम गट (८ ते १५ वर्षे) : प्रथम – श्रावणी गणपत चव्हाण, द्वितीय – नुपूर मंगेश चव्हाण, तृतीय – शर्वरी सत्यवान गावडे, उत्तेजनार्थ – प्रणिता गुरुनाथ चव्हाण.


खुला गट (१५ वर्षे पुढे) : प्रथम – शोभा सुधीर चव्हाण, द्वितीय – वेदा वैभव चव्हाण, तृतीय – सीमा विलास चव्हाण, उत्तेजनार्थ – मंजुषा शामसुंदर मेस्त्री.


समूह नृत्य स्पर्धा – निकाल :

लहान गट (५ ते १० वर्षे) : प्रथम – ‘बाई पण भारी देवा’ (युती मेस्त्री, आर्या मेस्त्री, अनुष्का मेस्त्री, रूची सांडव), द्वितीय – ‘आम्ही शिवकन्या’ (प्रणिता, वेदी, श्रावणी आणि खुशी चव्हाण), तृतीय – ‘दिल है छोटासा’ (आद्या चव्हाण, श्रीशा चव्हाण, श्रावणी श्रीधर चव्हाण).


खुला गट (११ वर्षे पुढे) : प्रथम – कोळी नृत्य (मधुरा गोवेकर, संचिता गोवेकर), द्वितीय – दिंडी नृत्य (गार्गी चव्हाण, समीक्षा चव्हाण, गायत्री चव्हाण, मेघाली, शोभा चव्हाण, वेदी, श्रावणी, खुशी, प्रणिता, काव्या, हर्षिका).


वैयक्तिक नृत्य – लहान गट :

प्रथम – श्रावणी गणपत चव्हाण, द्वितीय – वेदी गोविंद चव्हाण, तृतीय – आराध्या वैभव चव्हाण.


कार्यक्रमात उपस्थित महिलांनी व बालकांनी उत्स्फूर्तपणे गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. तसेच देवलीला ग्रामसंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि विविध गटप्रमुखांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


यावेळी व्यासपीठावर वरची देवलीचे सरपंच श्याम वाक्कर यांच्यासह डॉ. सुमेधा नाईक, देवली गावच्या पोलीस पाटील गौरी चव्हाण, माजी सरपंच गायत्री चव्हाण, सीआरपी मंजुषा मेस्त्री, देवलीला ग्रामसंघाच्या अध्यक्षा मधुरा महेश गोवेकर, अ‍ॅड. रुपेश आळवे असे विविध मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुरा गोवेकर यांनी केले. वेदा चव्हाण आणि डॉ. सुमेधा नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवलीला ग्रामसंघाच्या सर्व सदस्यांनी तसेच प्रिया नरेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी विशेष परिश्रम घेतले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स