ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
डांगमोडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जाम संडे कबड्डी संघ विजेता.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

डांगमोडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जाम संडे कबड्डी संघ विजेता.

डांगमोडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता.

Article image


जिल्हाप्रमुख व सुप्रसिद्ध उद्योजक दत्ता सामंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन तर बक्षिस वितरणाला प्रसिद्ध उद्योजक संदेश ठाकूर व मंडळाचे सदस्य, मान्यवर, खेळाडू कबड्डीप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित.


मसुरे | प्रतिनिधी : नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि डांगमोडे ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि मालवण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्यातून मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जाम संडे कबड्डी संघ विजेता ठरला आहे. १३ मार्च २०२६ रोजी भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त मसुरे डांगमोडे श्री देव रवळनाथ मंदिर नजीक मैदानावर ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत गिरोबा स्पोर्ट्स सांगेली कबड्डी संघ उपविजेता ठरला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला रोख रुपये दहा हजार व शिवाजी ठाकूर स्मृती चषक तर उपविजेत्या संघाला रोख रुपये ६.०००/_ आणि शिवाजी ठाकूर स्मृती चषक प्रदान करण्यात आला. 

Article image


या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख व सुप्रसिद्ध उद्योजक दत्ता सामंत आणि मालवण पंचायत समितीच्या नूतन सभापती प्रज्ञा चव्हाण, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.


या स्पर्धेत, एकूण १५ संघांनी सहभाग घेतला होता. तृतीय क्रमांक रियांश स्पोर्ट्स तेंडोली कबड्डी संघ आणि चतुर्थ क्रमांक श्री लक्ष्मीनारायण वालावल कुडाळ कबड्डी संघ यांनी प्राप्त केला. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक विजेत्या संघाला प्रत्येकी २, ०००/_ रुपये बक्षीस देण्यात आले. 


स्पर्धेतील उत्कृष्ट पकड म्हणून मकरंद पाटकर (पंचक्रोशी जामसंडे), उत्कृष्ट चढाई सिराज भडसाळे (पंचक्रोशी जाम संडे) आणि उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मयूर नाईक (गिरोबा स्पोर्ट्स, सांगेली) यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रत्येकी रोख रुपये ५००/_ आणि शिवाजी ठाकूर स्मृती चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


बक्षिस वितरण प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक संदेश ठाकूर ह्यांनी मनोगताद्वारे स्पर्धेच्या आयोजनाची प्रशंसा केली. यावेळी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे सहकार्यवाह नितीन हडकर यांचे कबड्डी क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

    

स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी येथील प्रसिद्ध उद्योजक संदेश शिवाजी ठाकूर, छोटू ठाकूर, प्रथमेश ठाकूर, गायत्री ठाकूर, ओमकार ठाकूर, राजेंद्र ठाकूर, महेश ठाकूर, अनिल ठाकूर, अमित ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, स्वप्निल ठाकूर, विष्णू ठाकूर, संजय ठाकूर, अक्षय ठाकूर, अमित ठाकूर, देविदास ठाकूर, मंगेश चव्हाण, परेश चव्हाण, सोमा ठाकूर, हरी ठाकूर, प्रकाश ठाकूर, किशोर ठाकूर, समीर ठाकूर, जितेंद्र परब, बाबू आंगणे, पुरुषोत्तम शिंगरे, राजेश गावकर,अजित कदम, समीर कदम, किशोर ठाकूर, परशुराम ठाकूर, कमलेश ठाकूर, मोहन ठाकूर, अनिल ठाकूर, बुधाजी ठाकूर, मंगेश ठाकूर, रमेश ठाकूर, दीपक ठाकूर, हर्ष कोंडस्कर, विशाल बागवे, प्रथमेश पराडकर, गुरुनाथ ठाकूर, बंटी ठाकूर, गणू ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते. 



स्पर्धेचे यशस्वीतेसाठी पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवतरुण मित्र मंडळ, डांगमोडे सदस्यांनी योगदान दिले.



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स