जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची 'राजकोट बाॅईज क्रिकेट संघ आणि राजकोट मित्रमंडळ आयोजित' प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची 'राजकोट बाॅईज क्रिकेट संघ आणि राजकोट मित्रमंडळ आयोजित' प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती.
राजकोट बॉईज क्रिकेट संघ आणि राजकोट मित्र मंडळाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार.
मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी, मालवणातील 'राजकोट बॉईज क्रिकेट संघ आणि राजकोट मित्रमंडळ' आयोजित प्रकाश झोतातील खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती होती. यावेळी राजकोट बॉईज क्रिकेट संघ आणि राजकोट मित्र मंडळाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा दिनांक ७ मार्च ते ११ मार्च या कालावधीत सहदेव बापर्डेकर व सोनू खांदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या स्पर्धेत 'सोहम तेजस स्पोर्ट्स, कुडाळ' हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर द्वितीय क्रमांक 'आदिनारायण, परूळे' संघाने पटकावला.
या स्पर्धेत महाराष्ट्रासह मुंबईस्थित नामवंत खेळाडूंचा सहभाग लाभला आणि प्रथमच मालवण मध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये मालिकावीर साठी दुचाकी पारितोषिक ठेवण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, मुंबई विद्यापिठ स्तरीय यश प्राप्त माजी लेदरबाॅल क्रिकेट कप्तान तथा शैलीदार फलंदाज व माजी क्रिकेटपटू नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेविका मेघा सावंत गावकर, नगरसेविका पूनम चव्हाण, भाग्यश्री लुडबे, अश्विनी कांदळकर, शिवसेना शहर संघटक राजू बिडये, ज्येष्ठ गोलंदाज व क्रिकेटतज्ञ नंदू देसाई यांच्यासह पदाधिकारी व अनेक आजी माजी खेळाडू, क्रिकेट चाहते उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
विरण येथे संपन्न क्रिकेट स्पर्धेचे ज्येष्ठ उद्योजक अनिल कांदळकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन.
विरण येथे संपन्न क्रिकेट स्पर्धेचे ज्येष्ठ उ...
मालवणात स्वर्गीय राजनभाई आंगणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू.
मालवणात स्वर्गीय राजनभाई आंगणे स्मृती चषक क्...
तारकर्ली क्रिकेट क्लबचा क्रिकेट तपस्वी पुरस्कार दांडी येथील भरत सारंग यांना जाहीर.
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.