देवलीतील महिलांसाठी पहिल्या 'कनो घालणे' स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
देवलीतील महिलांसाठी पहिल्या 'कनो घालणे' स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
ऊर्जा महिला मंडळ, वरची देवली आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांचे संयुक्त आयोजन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील 'वरची देवली' येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून 'कनो घालणे स्पर्धा' संपन्न झाली. बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी वरची देवली येथील सौ. प्रिया नरेश चव्हाण यांच्या निवासस्थानी ऊर्जा महिला मंडळ, वरची देवली आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संस्था, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने या मालवणी पारंपारिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुण्या इतिहास अभ्यासक डॉ. ज्योती तोरसकर, देवली सरपंच श्याम वाक्कर, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, ऊर्जा महिला मंडळ अध्यक्ष प्रा. डॉ. सुमेधा नाईक, मुंबईतील किंग जाॅर्ज महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापक ममता पालव, परीक्षक नगरसेविका मेघा सावंत आणि वैष्णवी आचरेकर व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील महिलांनी रचलेल्या स्वागत गीताच्या सादरीकरणाने करण्यात आली.
प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविक करताना 'कनो घालणे" या पारंपारिक कलेची ही अशी पहिलीच स्पर्धा असून परंपरेचा अमूल्य ठेवा जपणारी कला आहे अशी माहिती दिली. या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि देवली गावातील महिला व मुलींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी विशेष नमूद केले.
या 'कनो घालणे' स्पर्धेत कु. आर्या शामसुंदर मेस्त्री हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. सौ. दीक्षा दीपक देऊलकर ह्या द्वितीय क्रमांक आणि संजना संभाजी आचरेकर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. तनश्री तुषार चव्हाण आणि दर्शना दत्तात्रय चव्हाण यांना उत्तेजनार्थ म्हणून गौरवण्यात आले.
विजेत्या सर्वांना भेटवस्तू, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांनाही भेटवस्तू व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. दीक्षा देऊलकर यांनी स्पर्धकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेचे परीक्षण नगरसेविका मेघा सावंत आणि वैष्णवी आचरेकर यांनी केले. या स्पर्धेत ३९ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे इतिहास अभ्यासक डाॅ. ज्योती बुवा तोरसकर व सरपंच श्याम वाक्कर यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर संबोधित केले आणि 'कनो घालणे' स्पर्धेची संकल्पना व आयोजन यासह मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची प्रशंसा केली.
यावेळी मान्यवरांसह मालवणच्या नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेविका तसेच आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, सुदर्शन नाईक, मृण्मयी खोबरेकर, सेवांगण व्यवस्थापक संजय आचरेकर, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण व्यवस्थापन व परिवार तसेच तेजस्विनी पाताडे, देवली ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवलीला ग्रामसंघ अध्यक्षा मधुरा गोवेकर यांनी केले. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रिया नरेश चव्हाण, तनश्री तुषार चव्हाण आणि अभिलाषा अशोक चव्हाण कुटुंबियांनी मेहनत घेतली. प्रणय मेस्त्री यांनी ध्वनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
श्री. शिवाजी वाचन मंदिरात कागदी पिशव्या व लखोटे तयार करण्याचे प्रशिक्षण.
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंताना सरकार दरबारी न्याय मिळवून दिल्याची दशावतार कलावंतांची प्रतिक्रिया.
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंता...
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.