मालवणात गुढीपाडव्याला भरगच्च बक्षिसांसह वेशभूषा स्पर्धा.
मालवणात गुढीपाडव्याला भरगच्च बक्षिसांसह वेशभूषा स्पर्धा.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण आयोजित स्पर्धेची समिती संयोजक अमित खोत व संकल्पक भाऊ सामंत यांची यात्रा समितीच्या वतीने माहिती व सहभागाचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण बाजारपेठ मार्गांवरून यंदा गढीपाडव्याला 'हिंदू नववर्ष स्वागत यात्रा' निघणार आहे. यंदा ह्या यात्रेचे २३ वे वर्ष आहे. ह्या यात्रेला हिंदूप्रेमी व मालवणवासीय यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे आणि यात्रेच्या भव्यतेच्र्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
घोडे, चित्ररथ, देखावे, कोल्हापूर येथील मर्दानी खेळ, नेरूर येथील शिमगोत्सव, विविध वेशभूषा यांसह ढोल ताश्याच्या गजरात भगव्या उत्साहात स्वागत यात्रा निघणार आहे.
वेशभूषा स्पर्धेबद्दल माहिती.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निमित्ताने यंदाही, 'वेशभूषा स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे. बालवाडी ते चौथी, पाचवी ते दहावी असे बाल गट व शालेय गट असणार आहेत. तर खुल्या गटात पुरुष व महिला असे दोन गट असणार आहेत. चार गटात ही स्पर्धा होणार असून प्रत्येक गटातील विजेत्या पाच स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
स्पर्धकांची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी बंटी केनवडेकर मोबा : 9422596682, अनिकेत फाटक : 9421046390, अमिता निवेकर : 9923921507 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन 'हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संयोजक' अमित खोत व यात्रेचे संकल्पक भाऊ सामंत यांनी हिंदू नववर्ष यात्रा समितीच्या वतीने केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा कार्यक्रम.
मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या व...
वरची देवली येथे महिलांसाठी प्रथमच पाककला स्पर्धा उत्साहात.
वरची देवली येथे महिलांसाठी प्रथमच पाककला स्प...
मालवणात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे १८ जानेवारीला सिनेमा करीअर सेमिनार.
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.