ताज्या बातम्या
लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...! मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा कार्यक्रम.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा कार्यक्रम.

मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा कार्यक्रम. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिन मामा वरेरकर नाट्यगृह पटांगण येथे ८ मार्च रोजी विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे. नाचणी पासून बनवलेले पदार्थ पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

Article image


महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.



८ मार्च रोजी दुपारी २:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. मालवण शहरातील मर्यादित महिला व मुलींकरिता पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. (नाचणी पासून बनवण्यात येणारे पदार्थ) प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या २५ महिलांना स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने देण्यात येणार आहेत.


पाककला स्पर्धेसाठी नाव नोंदणीसाठी श्री. खेमराज सावंत (९५४५७२८८०२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स