ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मालवणात १५ वर्षांवरील विद्यार्थिनी, महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणात १५ वर्षांवरील विद्यार्थिनी, महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा.

मालवणात १५ वर्षांवरील विद्यार्थिनी, महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा.


स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने पर्यटन सप्ताह २०२५ - २६ निमित्ताने मालवण महिला विकास कक्ष व सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी व महिलांसाठी 'वीरांगना - भारतातील शूर स्त्री योद्ध्या' वेशभूषा स्पर्धा.


मालवण | ब्यूरो न्यूज : स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने पर्यटन सप्ताह २०२५ - २६ निमित्ताने मालवण महिला विकास कक्ष व सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी व महिलांसाठी 'वीरांगना - भारतातील शूर स्त्री योद्ध्या' वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

भारतीय इतिहासातील किल्ल्यांशी निगडित अनेक स्त्रियांनी शौर्य, त्याग आणि पराक्रमाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शुक्रवार ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयातील कै. नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात ही स्पर्धा संपन्न होणार आहे. 


या स्पर्धेत वय वर्षे १५ पुढील सर्व विद्यार्थिनी, महिला सहभागी होऊ शकतात. यातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ अशी ३ पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभागी स्पर्धकांनी आपण निवडलेल्या वीरांगनेची वेशभूषा सादर करायची आहे, तसेच निवडलेल्या वीरांगनेबद्दल एखादा संवाद किंवा माहिती सादर करायची आहे. यासाठी प्रत्येक स्पर्धकाला एका मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. 


या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ सप्टेंबर २०२५ पूर्वी डॉ. उज्वला सामंत ( संपर्क क्रमांक - ९४२१२६१४३९) यांच्याकडे नावनोंदणी करता येऊ शकेल आणि स्पर्धेबद्दल अधिक माहिती मिळवता येऊ शकेल अशी माहिती मिळत आहे.



समन्वयक डॉ. उज्वला सामंत, आय क्यू. ए. सी प्रमुख डॉ. सुमेधा नाईक व प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी सर्व विद्यार्थिनी व मालवण पंचक्रोशीतील महिलांना सहभागाचे आवाहन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स