मालवणात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे १८ जानेवारीला सिनेमा करीअर सेमिनार.
मालवणात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे १८ जानेवारीला सिनेमा करीअर सेमिनार.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आणि सिने कथा कीर्तन (कुर्ला टू वेंगुर्ला) यांचे आयोजन.
कलाप्रेमी बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त दादासाहेब शिखरे सभागृह येथे निःशुल्क कार्यक्रम.
मालवण | प्रतिनिधी : कलाप्रेमी बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आणि सिने कथा कीर्तन (कुर्ला टू वेंगुर्ला) यांच्या वतीने सिनेमा करिअर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी मालवण धुरीवाडा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संस्थेच्या दादासाहेब शिखरे सभागृहात सकाळी ९:३० ते दुपारी १२:०० या वेळेत सेमिनार संपन्न होणार आहे.
या सेमिनारला 'कुर्ला टू वेंगुर्ला' चित्रपटाचे लेखक, निर्माता आणि तंत्रज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे सेमिनार निःशुल्क असून १८ ते ३० वयोगटातील युवक - युवती सहभागी होऊ शकतात. नाव नोंदणीसाठी श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर (९४२२९४६२१२), श्री. संजय आचरेकर (९४२१५६९७०४) व श्री. वैभव मेस्त्री (८२९१३९५२५६) यांच्याशी संपर्क साधता येऊ शकेल.
या सेमिनारसाठी जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगण मालवण अध्यक्ष श्री. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर व पदाधिकारी, सदस्य, सेवांगण परिवार तसेच व्यवस्थापक संजय आचरेकर यांनी केले आहे.
'गडग्यावरच्या मुलांना पडद्यावर नेऊ पहाणारा' हा सेमिनार सिनेमासंबंधीच्या तांत्रिकतेशी थेट परिचय आणि इच्छुकांसाठी एक उत्तम संधी ठरणार असल्याची प्रतिक्रिया मालवणातील विविध सिने, नाट्य व कला जाणकारांनी व्यक्त केली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या ...
बॅरि. नाथ पै सेवांगण, मालवण संचलित व साने गुरुजी वाचन मंदिर आयोजित 'बाल - कुमार ज्ञानकोपरा' उपक्रम.
पर्यटन सप्ताह मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय स्पर्धां उत्साहात.
पर्यटन सप्ताह मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग मह...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.