वरची देवली येथे महिलांसाठी प्रथमच पाककला स्पर्धा उत्साहात.
वरची देवली येथे महिलांसाठी प्रथमच पाककला स्पर्धा उत्साहात.
कोकणच्या पारंपरिक 'पोषक रेसिपीज' ठरल्या आकर्षण.
तारकर्ली टूरिझम डेव्हलपमेंट सोसायटी अध्यक्ष व पर्यटन व्यावसायिक शेफ सहदेव साळगावकर यांची मुख्य अतिथी व परीक्षक म्हणून उपस्थिती.
मालवण | सानिका वायंगणकर : मकर संक्रांत व प्रजासत्ताक दिन २०२६ चे औचित्य साधून वरची देवली गावातील महिलांसाठी पाककला स्पर्धा संपन्न झाल्या. कोकणाची ओळख असलेला तांदूळ आणि त्यापासून तयार होणारे विविध पारंपरिक व नाविन्यपूर्ण पदार्थ ही या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना होती. या स्पर्धेला 'तारकर्ली टूरिझम डेव्हलपमेंट सोसायटी' अध्यक्ष व पर्यटन व्यावसायिक शेफ सहदेव साळगावकर यांची मुख्य अतिथी व परीक्षक म्हणून उपस्थिती. यावेळी व्यासपीठावर ऊर्जा महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुमेधा नाईक, माजी सरपंच गायत्री चव्हाण, देवली ग्रामसंघाच्या अध्यक्षा मधुरा गोवेकर व सी.आर.पी. मंजुषा मेस्त्री उपस्थित होत्या.
श्रीशा चव्हाण ( प्रथम क्रमांक)
या स्पर्धेत शिरवाळे, सात कप्प्याचे घावणे, उकड्या तांदळाची बर्फी, उकड्या तांदळाचे लाडू, फोडणीची कणी, तिरंगी डोसे , तसेच कोकणी पारंपारिक दूध गोळे यांसारख्या पोषक रेसीपीज खवय्यांसाठी विशेष आकर्षण ठरल्या. स्पर्धकांनी प्रजासत्ताक दिन व मकर संक्रांतीचे औचित्य लक्षात घेऊन केलेली पदार्थांची सजावट देखिल लक्षवेधी ठरली.
स्नेहल चव्हाण ( द्वितीय क्रमांक)
स्पर्धेचे परीक्षक आणि मुख्य अतिथी म्हणून तारकर्ली टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष, पर्यटन व्यावसायिक व शेफ सहदेव साळगावकर उपस्थित होते. परीक्षणापूर्वी त्यांनी स्पर्धकांना निकष व नियमांबाबत मार्गदर्शन केले, तर स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्यांना ट्रॉफी व आकर्षक बक्षिसे प्रदान केली.
जान्हवी गोवेकर ( तृतीय क्रमांक)
या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीशा चव्हाण (शिरवाळे व रस), द्वितीय क्रमांक स्नेहल चव्हाण (तांदुळपीठाचे स्प्रिंग मोमोज) तर तृतीय क्रमांक जान्हवी गोवेकर (भिजवलेल्या तांदळाचे पकोडे व चटणी) यांनी पटकावला. सहभागी स्पर्धकांना स्नेहभेट देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शेफ सहदेव साळगावकर यांनी त्यांच्या मनोगतात, स्पर्धेतील सहभागी महिलांनी 'गावपण' टिकवून ठेवलेले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. डाॅ. सुमेधा नाईक यांनी इथल्या महिलांना 'क्लाऊड किचन संकल्पना' राबवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नरेश चव्हाण, ओंकार चव्हाण, सौरभ चव्हाण, प्रिया चव्हाण व डॉ. सुमेधा नाईक यांनी विशेष योगदान दिले. सूत्रसंचलन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.
सौ. प्रिया नरेश चव्हाण यांच्या निवासस्थानी आयोजीत या स्पर्धेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच वरची देवली गावात प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजीत झाल्याने, कोकणातील पारंपरिक आहार पद्धतीला पोषक प्रोत्साहन मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वात लहान स्पर्धक श्रेया चव्हाण व सर्वात ज्येष्ठ स्पर्धक दक्षता चव्हाण यांची विशेष प्रशंसा करण्यात आली.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.शेत...
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मो...
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर य...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.