ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान.


Article image


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडी हिंदुस्तान पॉलिमर उद्यम नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी 'हिंदुस्तान पाॅलीमार' कंपनीचे पार्टनर टी. के. मुदालीअर, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी व महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब, उपाध्यक्ष आनंद कांडरकर, सरचिटणीस आर. के. सावंत, सदस्या कु‌. सिध्दी पारकर, सदस्या रेवती वालावलकर, सदस्य श्रीमती वेंगुर्लेकर, रणजित जाधव आदी उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांनी महिलांचे जीवन व समाजात परिवर्तन यासाठी महिलांना प्रत्येक क्षेत्रातिल वाटचालीसाठी आत्मविश्वासपूर्ण पुढाकाराचा' विशेष मंत्र दिला.


यावेळी संबोधित करताना सरचिटणीस आर. के. सावंत म्हणाले की महिला दिन हा केवळ एका दिवसा पुरता मर्यादित नाही तर हा महिलांचे हक्क, सन्मान सशक्तीकरणासाठीचा संदेश देणारा दिवस आहे‌. महिलांचे प्रत्येक क्षेत्रात सहभाग 

आणि योगदान महत्त्वाचे आहे.


महिलांच्या सन्मानाला प्रातिनिधिक संबोधन व्यक्त करताना कु. भक्ती मठकर यांनी सर्वांचे सहकार्य व पाठिंबा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कांडरकर यांनी केले आणि रणजित जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स