ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
फीन ॲलनच्या 'गॅलन'भर षटकार व विक्रमी शतकासह न्यूझीलंड टी - २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत...!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

फीन ॲलनच्या 'गॅलन'भर षटकार व विक्रमी शतकासह न्यूझीलंड टी - २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत...!

प्रकाशन: 04 Mar 2026 10:13 PM
वाचन संख्या 264

फीन ॲलनच्या 'गॅलन'भर षटकार व विक्रमी शतकासह न्यूझीलंड टी - २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत...!

Article image



क्रीडा : न्यूझीलंडचा सलामीवीर फीन ॲलनच्या ३३ चेंडूतील '८ षटकारांसह' ठोकलेल्या विक्रमी शतकासह टी - २० विश्वचषक २०२६ मधील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझिलंडने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीला संपूर्ण निष्प्रभ करत अंतिम फेरीत प्रवेश केला. कोलकाता ईडन गार्डन येथे रंगलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझिलंडचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या १६९ धावांचा पाठलाग करत होता.


न्यूझीलंड संघाने स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर एकतर्फी विजय मिळवला आहे. हा विजय तब्बल ९ बळी आणि ४७ चेंडू राखून मिळवलेला विजय आहे.


संघाचे सलामीवीर फिन एलन व टीम सेफर्ट संघाच्या विजयाचा मार्ग तयार करून दिला. फिन एलनने बाराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर टी - २० विश्वचषकातील विक्रमी शतक झळकावत संघाचा विजय निश्चित केला.


दक्षिण आफ्रिकेच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नव्हता, त्यामुळे सेमीफायनल जिंकण्यासाठी संघ 'फेव्हरेट' मानला जात होता पण न्यूझीलंडने त्यांना धक्का दिला.  न्यूझीलंड संघाने प्रथम शिस्तबद्ध गोलंदाजी करताना द. आफ्रिकेला १६९ धावांवर रोखलं. तर प्रत्युत्तरात १२.५ षटकांत १७० धायांचा यशस्वी पाठलाग करत हा विक्रमी विजय मिळवला.


दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची वादळी सुरूवात झाली. सामनावीर फिन एलन व टीम सेफर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची विक्रमी भागीदारी रचली. यासह किवींनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ८६ धावा केल्या होत्या. सेफर्ट ३३ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा करत बाद झाला. पण सामनावीर फिन ॲलनने विक्रम रचत ३३ चेंडूत १० चौकार व ८ षटकारांसह शतकी खेळी साकारली आणि त्याला रचिन रवींद्रने १३ धावा करत साथ दिली.


आता क्रिकेट चाहत्यांच्या नजरा, मुंबई येथील भारत विरुद्ध इंग्लंड मधल्या पुढच्या उपांत्य सामन्याकडे लागलेल्या आहेत.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स