ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
तारकर्ली क्रिकेट क्लबचा क्रिकेट तपस्वी पुरस्कार दांडी येथील भरत सारंग यांना जाहीर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

तारकर्ली क्रिकेट क्लबचा क्रिकेट तपस्वी पुरस्कार दांडी येथील भरत सारंग यांना जाहीर.

तारकर्ली क्रिकेट क्लबचा क्रिकेट तपस्वी पुरस्कार दांडी येथील भरत सारंग यांना जाहीर.


मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंडवर ५ मार्च रोजी पुरस्कार वितरण.


तारकर्ली क्रिकेट क्लबच्या वतीने गोविंद उर्फ बंटी केरकर यांची माहिती.


मालवण : मालवण तालुक्यातील 'तारकर्ली क्रिकेट क्लब' 'कै. गोपाळकृष्ण केळूसकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'क्रिकेट तपस्वी' पुरस्कार, यंदा मालवण दांडी येथील श्री. भरत सारंग यांना जाहीर करण्यात आला आहे. क्रिकेटसाठी तन, मन आणि धन अर्पिणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. गतवर्षी हा पुरस्कार देवबाग येथील श्री विष्णु उर्फ दादू रेवंडकर यांना प्रदान करण्यात आला होता.


श्री. भरत सारंग यांनी नव्वदच्या दशकात 'भरत इलेव्हन, दांडी ' या संघाची स्थापना करून दांडी भागातील खेळाडूना या संघात खेळण्याची संधी दिली होती. त्या संघाने अनेक स्पर्धा जिंकून नावलौकिक मिळवला होता. आजही भरत सारंग 'मैदानावर उपस्थित राहून' दांडी संघाला प्रोत्साहन देतात.


शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या ५ मार्च रोजी मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती तारकर्ली क्रिकेट क्लबच्या वतीने गोविंद उर्फ बंटी केरकर यांनी दिली आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स