ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मालवणच्या युगंधा लक्ष्मीकांत खोबरेकर हिची एस. व्ही. टी. महाविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेत उल्लेखनीय कामगिरी.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणच्या युगंधा लक्ष्मीकांत खोबरेकर हिची एस. व्ही. टी. महाविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेत उल्लेखनीय कामगिरी.

मालवणच्या युगंधा लक्ष्मीकांत खोबरेकर हिची एस. व्ही. टी. महाविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेत उल्लेखनीय कामगिरी.

Article image


एस. व्हि. टी. कॉलेज (एस. एन. डी. टी महिला विद्यापीठ) चे दमदार यश.

Article image

Article image

कु. युगंधा लक्ष्मीकांत खोबरेकर


केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेली परिषद.

Article image


मालवण | प्रतिनिधी : ए. व्ही. टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, जुहू, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी NIFTEM (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट), कुंडली (सोनीपत) येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ॲडव्हान्स्ड नेक्स्ट जनरेशन व्हिजन फॉर इमर्जिंग अँड सस्टेनेबल हेल्दी फूड्स (ANVESH 2026) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. ही आंतरराष्ट्रीय परिषद MOFPI (मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया) अंतर्गत केंद्रीय मंत्री श्री चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, ज्यामध्ये २५ पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते. 

Article image


या परिषदेत मालवणच्या युगंधा लक्ष्मीकांत खोबरेकर हिने पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. “Development of Green Chutney Mix Enriched with Moringa Oleifera Leaves Powder” या विषयावर तिने प्रेझेंटिंग ऑथर म्हणून प्रभावी सादरीकरण केले. हे संशोधन डॉ. सुलक्षणा माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून या सादरीकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक करण्यात आले. तसेच, कु. ध्वनी मलकान हिने ओरल प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. 

Article image


या सादरीकरणात कु. युगंधा खोबरेकर हिने कु. वृश्टी जोबालीया, कु. अरोमा कोळी आणि कु. इफ्रा मन्सुरी यांच्यासह को - ऑथर म्हणून सहभाग नोंदवला. हे सादरीकरण प्रोफेसर. झैनाब पाथारिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या परिषदेत Food Nutrition and Dietetics विभागातील २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे ॲब्स्ट्रॅक्ट्स निवडले गेले, जे विभागाच्या मजबूत रिसर्च कल्चर व अकॅडमिक एक्सलन्सचे प्रतीक आहे.


या यशामध्ये मिस. प्रणाली दराडे आणि डॉ. राजेश्री शिंदे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले अशी प्रतिक्रिया मिळत असून ही कामगिरी महाविद्यालयसाठी अभिमानास्पद असून विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेचे द्योतक आहे असे समजते.

Article image

  

कु. युगंधा खोबरेकर ही मालवणचे सुप्रसिद्ध स्थापत्य अभियंता व उद्योजक श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर व सौ. मृण्मयी खोबरेकर यांची द्वितीय कन्या आहे. कु. युगंधा खोबरेकर हिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण परिवाराच्या वतीने कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर यांनी कु. युगंधा खोबरेकर हिच्या कामगिरीची अभिनंदपर प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स