ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
महा आवास अभियानात ग्रामपंचायत बोर्डवेचे यश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

महा आवास अभियानात ग्रामपंचायत बोर्डवेचे यश.

महा आवास अभियानात ग्रामपंचायत बोर्डवेचे यश.          


मसुरे | प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या महा आवास अभियान अंतर्गत ग्रामपंचायत बोर्डवेला उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


ग्रामविकासाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण व परिणामकारक कामगिरी करत ग्रामपंचायत बोर्डवेने कोकण विभागात आपला ठसा उमटवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल ओसरगाव नं. १ शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंचांचा सत्कार केला.


यावेळी सरपंच श्रीमती वेदांगी पाताडे, उपसरपंच श्री. अक्षय शिंदे, सदस्य श्री. महावीर साळवी, पोलिस पाटील, ग्रामस्थ श्री. प्रकाश पेडणेकर, श्री. शरद साळवी, श्री. मंगेश बागवे तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री. दत्तात्रय तळवडेकर उपस्थित होते.


या पुरस्कारामध्ये माजी सरपंच श्री. राजेंद्र मोडक, ग्रामपंचायत अधिकारी श्री. दयानंद गंगावणे व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असून संपूर्ण गावाचे यश असल्याचे सरपंचांनी नमूद केले. या कामगिरीबद्दल ग्रामपंचायत बोर्डवेच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे. भविष्यातही ग्रामविकासासाठी अशीच प्रगतीशील वाटचाल सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सागरी किल्ले अध्ययन केंद्रासाठी पुढाकाराबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने कृतज्ञता सन्मान.

लोकप्रिय टॅग्स