ताज्या बातम्या
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा. तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग.

जाहिरात

सागरी किल्ले अध्ययन केंद्रासाठी पुढाकाराबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने कृतज्ञता सन्मान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

सागरी किल्ले अध्ययन केंद्रासाठी पुढाकाराबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने कृतज्ञता सन्मान.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

सागरी किल्ले अध्ययन केंद्रासाठी पुढाकाराबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने कृतज्ञता सन्मान.

Article image


जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, सदस्य विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, डॉ. ज्योती बुवा तोरसकर, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. संग्रामसिंह पवार आणि प्रा. हसन ख़ान यांची उपस्थिती.


कणकवली | ब्यूरो न्यूज : राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. मालवण येथे 'सागरी किल्ले अध्ययन केंद्र' स्थापन करण्यासाठी त्यांनी केलेल्या पुढाकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान करण्यात आला. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य गुरुनाथ राणे यांच्या हस्ते मंत्री आशिष शेलार यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. 


यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी सागरी किल्ले अध्ययन केंद्राच्या स्थापनेसाठी आवश्यक वित्तीय मान्यता व तांत्रिक बाबींमध्ये शासनाच्या स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.  या सत्कार प्रसंगी संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे त्यांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.



छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे साक्षीदार असलेल्या सागरी किल्ल्यांचा इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने जगासमोर आणण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे मा. आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत मालवण येथे सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार अभेद्य सागरी किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी विशेष 'अध्ययन केंद्र' स्थापन करण्याची घोषणा त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८ वर्षपूर्ती सोहळ्यात केली होती. तसेच त्यांनी या केंद्रासाठी पन्नास लाख रुपयांचा निधीही घोषित केला होता. त्यांच्या घोषणेनुसार मुंबई विद्यापीठ संलग्न स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती प्रा. डाॅ. सुमेधा नाईक यांनी दिली आहे. 

  


सिंधुदुर्ग, राजकोट, सर्जेकोट व पद्मदुर्ग हे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले ऐतिहासिक सागरी किल्ले असून, मराठा आरमाराच्या इतिहासात त्यांना विशेष स्थान आहे. या अध्ययन केंद्रामार्फत जलदुर्गांचा इतिहास, स्थापत्य वैशिष्ट्ये, मराठा सागरी रणनीती व सांस्कृतिक वारसा यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जाणार आहे. तसेच मोडी, पर्शियन व पोर्तुगीज भाषेतील ऐतिहासिक दस्तऐवजांचे संकलन व भाषांतर, किल्ल्यांचे डिजिटायझेशन (थ्री डी स्कॅनिंग, नकाशे), संशोधन प्रकल्प, अभ्यासदौरे, कार्यशाळा व सेमिनार यांसारखे विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. ‘सागरी किल्ले वारसा, संवर्धन व व्यवस्थापन’ या विषयावर अभ्यासक्रम सुरू करण्याचाही मानस आहे.



यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, सदस्य विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, प्रा. डाॅ. सुमेधा नाईक, इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. ज्योती बुवा तोरसकर, प्रा. डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. संग्रामसिंह पवार आणि प्रा. हसन ख़ान उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आ...

31 Aug 2026 652

लोकप्रिय टॅग्स