ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
आ. निलेश राणे यांनी जनतेसमोर मांडलेल्या विकासाची अष्टसूत्री पूर्णत्वास नेण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील : नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आ. निलेश राणे यांनी जनतेसमोर मांडलेल्या विकासाची अष्टसूत्री पूर्णत्वास नेण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील : नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर

प्रकाशन: 27 Feb 2026 03:52 PM
वाचन संख्या 197

आ. निलेश राणे यांनी जनतेसमोर मांडलेल्या विकासाची अष्टसूत्री पूर्णत्वास नेण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील : नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर. 

Article image


जिल्हा नगरोत्थान निधीतून मालवण नगरपरिषदेला १ कोटींचा निधी मंजूर झाल्याची नगराध्यक्षा सौ. वराडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती . 


खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची नगराध्यक्षांकडून कृतज्ञता.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील, आमदार निलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी शहर विकासासाठी नगरोत्थान मधुन १ कोटींचा निधी जाहीर झाल्याची माहिती दिली. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या ह्या पत्रकार परिषदेत, उपनगराध्यक्ष तथा शहरप्रमुख दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका मेघा गावकर उपस्थित होते.  


खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रयत्नाने जिल्हा नगरोत्थान निधीतून मालवण नगरपालिकेला १ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नगरपालिका निवडणुकीत जनतेने केलेल्या मागणीनुसार या निधीतून शहरातल्या १ ते १० प्रभागातील कामे मंजूर करण्यात आली असून यात विविध कामांचा समावेश असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिली आहे असे समजते.


१ कोटीचा निधी मंजूर झाल्याबद्दल त्यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले, आडवण रोड चंद्रकांत चव्हाण यांच्या घरासमोर संरक्षक भिंत बांधकाम करणे, वायरी प्रसाद मिठबावकर नाका ते मिठबावकर घरापर्यंत जाणाऱ्या पायवाटेवर पेव्हर ब्लॉक बसविणे, नामदेव आचरेकर दांडी घरापासून महादेव मार्गापर्यंत आर. सी. सी गटार बांधकाम करणे, विलास केरकर घर गवंडीवाडा ते शर्वरी पाटकर घरापर्यंत कॉंक्रेट रस्ता बनविणे, मालवण मेढा रामगल्ली येथील रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे, मेढा मालवण चंदू सरकारे घरासमोरील रस्ता ते शंकर मंदिर प्रदक्षिणा मार्गावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, मालवण नगरपालिका हद्दीतील कोतेवाडा मधील अविनाश आंबरेकर घर ते साई मयेकर घरापर्यंत आर सी सी गटार बांधणे, विनायक रेडकर घर रोझरी चर्च शेजारी ते मंगल कांबळी घरापर्यंत आर. सी. सी. लाद्या बसविणे, राजन सरमळकर घर ते पिंपळपार रस्त्यामध्ये सामंत घर ते लोके घर आर. सी. सी. गटार बांधकाम करणे, मालवण नगरपालिका हद्दीतील डॉ. दिघे घर ते रांगोळी मठापर्यंत आर सी सी गटार बांधकाम करणे, मालवण नगरपालिका हद्दीतील आडारी रेवतळे मुख्य रस्ता ते प्रकाश कोरगावकर घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, धुरीवाडा साळसकर स्मशानभूमी पंपशेड आणि जळाऊ लाकूड ठेवण्यासाठी शेड बांधणे व अंतर्गत सुविधा पुरविणे, कोचरेकर घर ते राजन सरमळकर घरापासून आरोलकर घरापर्यंत आर. सी. सी. गटार बांधकाम करणे, धुरीवाडा दिलीप हडकर दुकान ते बोर्डिंग ग्राउंड कॉर्नर ते वैभव मयेकर घरापर्यंत आर. सी. सी. गटार बांधकाम करणे अशा कामांचा समावेश आहे असे स्पष्ट केले.


मालवण शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी नगरपरिषद निवडणुकीत जनतेला दिलेले विकासाचे प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न राहणार आहेत. नगरपरिषद निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी विकासाची अष्टसूत्री जनतेसमोर मांडली. ती पूर्णत्वास नेण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील असे नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी सांगितले आणि आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून यासाठी आवश्यक निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्याचीही ग्वाही दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स