मालवणच्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगणातील साने गुरुजी वाचन मंदिरात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कथावाचन उपक्रम उत्साहात.
मालवणच्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगणातील साने गुरुजी वाचन मंदिरात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कथावाचन उपक्रम उत्साहात.
ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांचे विशेष मार्गदर्शन.
नितीन वाळके, प्रा. योगेश मुणगेकर, रमा पराडकर, दिलीप रेडकर, मैत्रेयी बांदेकर व वैश्विका कदम यांचे कथावाचन.
मालवण | सानिका वायंगणकर : मालवण शहरातल्या धुरीवाडा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरात ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विविध पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, मंगल साटलकर, बॅ. नाथ पै सेवांगण कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, संग्राम कासले तसेच सेवांगण व्यवस्थापक संजय आचरेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या 'खरा तो एकचि धर्म' प्रार्थनेने व 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या कवितेने करण्यात आली. प्रमुख ग्रंथपाल ॠतुजा केळकर, वैष्णवी आचरेकर, सोनाली कोळंबकर, तेजश्री पाताडे व गौरी केळुसकर यांनी प्रार्थनेचे व कवितेचे सादरीकरण केले.
कवि कुसुमाग्रजांने वंदन करुन त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प अर्पण करण्यात आले. मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्यासह नितीन वाळके, प्रा. योगेश मुणगेकर, रमा पराडकर, दिलीप रेडकर, मैत्रेयी बांदेकर व वैश्विका कदम यांनी कथावाचन केले. सर्व सहभागी वाचकांना ग्रंथभेट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात पुस्तक देण्यात आले.
यावेळी साहित्यिक वैशाली पंडित यांनी उपस्थितांना मनोगतपर विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांसह प्रा. डॉ. सुमेधा नाईक, श्री. साटम, मालवण डी. एड. काॅलेज, जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूल, रेकोबा हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, वाचक सदस्य व सेवांगण व्यवस्थापन वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन साने गुरुजी वाचन मंदिरच्या प्रमुख ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
अ. भा. गंधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय संगीत परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश.
लेखक सुरेश ठाकूर यांचे पुस्तक संवेदनशील 'प्रतिभे'सह 'शब्दांच्या पलिकडे'...!
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या ...
भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शलाका वार्षिकांकाचे प्रकाशन.