ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
'परिमाण'कारक ; पत्रकार श्री. राकेश परब ( बांदा, सिंधुदुर्ग)वाढदिवस विशेष.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

'परिमाण'कारक ; पत्रकार श्री. राकेश परब ( बांदा, सिंधुदुर्ग)वाढदिवस विशेष.

प्रकाशन: 28 Feb 2026 11:27 AM
वाचन संख्या 240

'परिमाण'कारक...!'


पत्रकार श्री. राकेश परब ( बांदा, सिंधुदुर्ग)वाढदिवस विशेष. 



दिनांक : २८ फेब्रुवारी २०२६


Article image


संपादकीय विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील पत्रकार श्री. राकेश परब...!

श्री. राकेश परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, गेली दोन दशके पत्रकारितेला तिच्या 'परिमाणांसह' जपलेल्या व्यक्तिंपैकी एक आदराचे नांव आहे. साल २००० नंतरच्या 'मिलेनियम' तथा नूतन सहस्त्रकीय वातावरणात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पत्रकारितेच्या क्षेत्रात 'आवड' म्हणून आलेल्या राकेश ह्यांच्यासारख्या काही व्यक्ती पत्रकारितेची परिमाणं व मापदंड ह्यांना सोबत घेऊन या क्षेत्रात रुजल्या, फुलल्या, खुलल्या..! त्यांनी सात्विकतेला त्यांच्या कामाचा आधार बनवून प्रसिद्धी 'द्यायचे' कौशल्य आत्मसात केले. दरम्यान, त्यांच्या मागच्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकारांनी मळलेल्या वाटेवर चालताना, शिस्तपूर्ण नाविन्याचीही कास धरली हे विशेष...!


श्री. राकेश परब हे सावंतवाडी व बांदा परिसरातील विविध मुद्दे, घटक, व्यक्ती ह्यांच्या प्रसिद्धी दरम्यान भेटत गेलेल्या प्रत्येकाशी सुसंवाद तसंच व्यापकतेच्या प्रोत्साहक जाणीवांमधून स्वतःतील सहकारी माणुसपणाचा स्तर वाढवत गेले. त्यांची पत्रकारितेच्या 'परिमाणांना' जपून केलेली कामं नकळत अनेक कार्यांना सहकार्य ठरू लागली....ती अगदी आजपर्यंत..!  


श्री. राकेश यांचे स्वतःतील कलासक्ती जपून सर्वांगीण घडत जाणारे व्यक्तिमत्व अनेक पुरस्कारांनी नटलेले आहे. ह्या अनेक पुरस्कारांतला न दिसणारे सर्वोच्च पुरस्कार म्हणजे 'खात्रीलायकता किंवा त्यांच्याकडील माहितीची शाश्वती' हे आहेत. पत्रकार म्हणून उद्देशांची निर्मळता ही कधीच कसोटी, परिमाण व मापदंड नसतील किंवा असतीलही परंतु परिमाणांसह जपलेल्या पत्रकारितेच्या परिणामांची जाणीव ही सजगता हा राकेश ह्यांनी कष्टाने जडवलेला दागिना ठरला आहे.


श्री. राकेश परब ह्यांचं व्यक्तिमत्व हे विशेषकरुन डिजीटल तंत्रयुगात, अनेक पत्रकारिता इच्छुक होतकरूंसाठी 'प्रसिद्धीसोबत आत्मसिद्धी' चा 'परिमाणकारक' शाश्वत मार्ग दाखवत असते.


सुयोग पंडित (मुख्य संपादक, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.)

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स