ओसरगाव शाळेत व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य कार्यशाळा संपन्न.
ओसरगाव शाळेत व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य कार्यशाळा संपन्न.
मसुरे | प्रतिनिधी : कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे ओसरगाव नं. १ शाळेत 'व्यक्तिमत्त्व विकास व संवाद कौशल्य' कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुशल विद्यार्थी घडविण्यासाठी महाविद्यालयाचे मोलाचे कार्य सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत प्रणित परब व जय वळंजू या विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी समजेल अशा पद्धतीने संवाद साधत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यशाळेचा लाभ घेतला.
यावेळी मुख्याध्यापक किशोर कदम, पदवीधर शिक्षक शितल दळवी तसेच उपशिक्षक राजश्री तांबे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगत शाळेच्या वतीने महाविद्यालयाचे आभार मानण्यात आले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कळसुलीत माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे उद्घाटन.