ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मालवणमध्ये 'हेरिटेज टूर गाईड' अभ्यासक्रमाचा समारोप.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणमध्ये 'हेरिटेज टूर गाईड' अभ्यासक्रमाचा समारोप.

मालवणमध्ये 'हेरिटेज टूर गाईड' अभ्यासक्रमाचा समारोप.

Article image


मान्यवरांकडून अभ्यासक्रमाची प्रशंसा.


स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व लेखाशास्त्र विभागाचे संयुक्त आयोजन. 


मालवण | सानिका वायंगणकर : मालवण शहरातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व लेखाशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या हेरिटेज टूर गाईड प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा २५ फेब्रुवारी रोजी समारोप झाला . ११ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील अभ्यासक्रमात एकूण २३ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. या वेळी सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.


समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण होते तर संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांनी 'हेरीटेज टूर गाईड अभ्यासक्रम' या प्रकल्पाची प्रशंसा केली आणि पर्यटन क्षेत्रात 'हेरिटेज वाॅक व हेरीटेज टूर' च्या माध्यमातून नवे पर्व सुरू झाल्याचे सांगितले. 


या अभ्यासक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थींना व्याख्याने, पॉवर पॉईंट सादरीकरणे, क्षेत्रभेटी, प्रत्यक्ष हेरिटेज वॉक, तसेच लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. मालवण आणि परिसरातील विविध ऐतिहासिक व वारसा स्थळांना भेटी देऊन तेथील माहिती संकलित करण्यात आली. विशेष म्हणजे, मालवण शहरातील पहिला अधिकृत हेरिटेज वॉक देखील याच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला अशी विशेष माहिती प्रा. डाॅ. सुमेधा नाईक यांनी आयोजन संचाच्या वतीने दिली आहे.


अभ्यासक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या शंभर गुणांच्या परीक्षेत प्रीती सुनील वैद्य यांनी प्रथम, सूर्यकांत दाजी कदम यांनी द्वितीय, तर पूर्वा परेश तारी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. स्वप्निल मिटकर आणि निखिल तेली यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.


प्रशिक्षणार्थी निखिल तेली, निखिल नेरकर, शैलेश सामंत, स्वप्निल मिटकर, सायली मयेकर, प्रीती वैद्य आदींनी मनोगत व्यक्त करताना या अभ्यासक्रमामुळे वारसा पर्यटनाचे प्रत्यक्ष ज्ञान, ऐतिहासिक स्थळांची सखोल माहिती आणि हेरिटेज टूर गाईड म्हणून कार्य करण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाल्याची भावना व्यक्त केली.


महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या आगामी अभ्यासक्रमांची माहिती दिली. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व बोर्ड ऑफ स्टडीज सदस्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


अभ्यासक्रमाचे प्रास्ताविक संयोजक गुरुनाथ राणे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. या अभ्यासक्रमासाठी अंबिका कॉम्प्युटर्स आणि एशियन इन्फोटेक यांचे प्रायोजकत्व लाभले. डॉ. योगेश पिसोळकर, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. ज्योती बुवा तोरसकर आणि पर्यटन तज्ज्ञ गुरुनाथ राणे यांनी प्रशिक्षण दिले.यावेळी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ( IQAC) चे नूतन सदस्य रुपेश तायशेटे यांची उपस्थिती होती. 


दरम्यान, एप्रिल महिन्यापासून मालवणमध्ये पर्यटकांसाठी नियमित हेरिटेज वॉक सुरू करण्याचा निर्धार संयोजक आणि प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला असून, या उपक्रमामुळे मालवणच्या वारसा पर्यटनाला चालना मिळण्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स