ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
'असावा सुंदर समतेचा बंगला...'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'असावा सुंदर समतेचा बंगला...'

'असावा सुंदर समतेचा बंगला...'

Article image


ओसरगाव जि. प. शाळा क्रमांक १ येथे महिला उत्कर्ष मंडळाच्या वतीने पहिला बालमेळावा उत्साहात. 


महिला उत्कर्ष मंडळ (मासूम), पुणे यांच्या संविधान संवर्धन फेलोशिप अंतर्गत संविधान जागृतीपर उपक्रम.

Article image


मसुरे | प्रतिनिधी : महिला उत्कर्ष मंडळ (मासूम), पुणे यांच्या संविधान संवर्धन फेलोशिप अंतर्गत ओसरगाव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे शनिवार, ४ जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी संविधान जागृतीवर आधारित पहिला बालमेळावा संपन्न झाला. यावेळी बोर्डवे केंद्रप्रमुख पंढरीनाथ तेंडोलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिवबा अपराज, मुख्याध्यापक किशोर कदम, ॲड. स्वाती तेली यांची प्रमुख उपस्थिती होती. 


यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सोनचाफ्याचे कलम लावून करण्यात आले. ग्रामीण भागातील महिला, मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये संविधानातील मूल्ये, हक्क आणि अधिकार यांची जाणीव निर्माण करण्यासाठी मासूम संस्था सातत्याने कार्यरत आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या बालमेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ओवीच्या सामूहिक गायनाने झाली.


'चला हसत - खेळत संविधान समजून घेऊया' या संकल्पनेवर आधारित मेळाव्यात चला मैत्री करूया, आईचे पत्र हरवले, चॉकलेट खेळ तसेच विविध खेळ, गीते आणि समूह उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानातील समता, समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, हक्क आणि कर्तव्ये यांची ओळख करून देण्यात आली. सामाजिक भान, परस्पर सहकार्य आणि लोकशाही मूल्यांची रुजवण करण्याचा प्रभावी प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.


मासूम संस्थेच्या फेलो प्राजक्ता नेमळेकर यांनी, 'असावा सुंदर समतेचा बंगला' हे प्रेरणादायी गीत सादर करून विद्यार्थ्यांना समता आणि न्याय या संविधानिक मूल्यांचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला संविधानाची उद्देशिका भेट देण्यात आली. 


कार्यक्रमाचे उद्घाटक तथा बोर्डवे केंद्राचे केंद्रप्रमुख पंढरीनाथ तेंडोलकर यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले, विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून संविधानिक मूल्यांची रुजवण होणे अत्यंत आवश्यक आहे. मासूम संस्था अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, लोकशाही मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करण्याचे मोलाचे कार्य करत आहे. जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच बालमेळावा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


मुख्याध्यापक किशोर कदम यांनी मासूम संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत आनंददायी पद्धतीने पोहोचविणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून भविष्यातही अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अधिक सक्षम होईल, असे मत व्यक्त केले.


यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवबा अपराज, बोर्डवे केंद्राचे केंद्रप्रमुख पंढरीनाथ तेंडोलकर, मुख्याध्यापक किशोर कदम, शिक्षिका प्रमिता तांबे, राजश्री तांबे, मासूम फेलो ॲड. स्वाती तेली, फेलो प्राजक्ता नेमळेकर, दया आजवेलकर, प्रिया जाधव, अपेक्षा चव्हाण, अर्चना तोरसकर तसेच विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता तांबे यांनी केले व आभार राजश्री तांबे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सागरी किल्ले अध्ययन केंद्रासाठी पुढाकाराबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने कृतज्ञता सन्मान.
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!

लोकप्रिय टॅग्स