ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणात प्रथमच 'हेरिटेज टूर गाईड' कोर्स.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात प्रथमच 'हेरिटेज टूर गाईड' कोर्स.

मालवणात प्रथमच 'हेरिटेज टूर गाईड' कोर्स.


सिंधुदुर्गच्या वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी इच्छुकांनी लाभ घ्यायचे आवाहन. 



मालवण | प्रतिनिधी : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने 'हेरिटेज टूर गाईड' प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम दिनांक ११ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण परिसराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा लाभलेला असून मराठा आरमाराचा गौरवशाली इतिहास, किल्ले, मंदिरे, लोककला, खाद्यसंस्कृती व सागरी परंपरा यामुळे हा परिसर जागतिक पर्यटन नकाशावर ओळखला जात आहे. हा वारसा पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशिक्षित हेरिटेज टूर गाईडची गरज लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.


या अभ्यासक्रमामध्ये हेरिटेज वॉकसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण, हेरिटेज वॉक व्यवस्थापन, ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटी, मालवण व आजूबाजूच्या परिसरातील वारसा स्थळांची सखोल माहिती तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील संवाद कौशल्यांचा समावेश आहे. पुणे येथील तज्ज्ञ प्रा. योगेश पिसोळकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


१८ वर्षांवरील मालवणमधील विद्यार्थी, पर्यटन व्यवसायिक, पर्यटन संस्थांचे सदस्य, होम स्टे व हॉटेल मालक, चालक, कर्मचारी तसेच रिक्षा व कार चालकांसाठी हा अभ्यासक्रम खुला आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वयंरोजगाराच्या संधी, पर्यटन क्षेत्रातील रोजगार हॉटेल व पर्यटन व्यावसायिकांशी टाय अप तसेच मालवणचा इतिहास व वारसा जागतिक स्तरावर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क १,००० रुपये असून अधिक माहितीसाठी डॉ. सुमेधा नाईक 9404924678, गुरुनाथ राणे 9420200991 व कृतिका न्हिवेकर 9764358709 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सिंधुदुर्गच्या वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी इच्छुकांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी केले आहे अशी माहिती प्रा. डाॅ. सुमेधा नाईक यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स