मुंबईत घाडीगावकर समाजाचा वधू - वर मेळावा संपन्न.
मुंबईत घाडीगावकर समाजाचा वधू - वर मेळावा संपन्न.
अध्यक्ष घन:श्याम गावकर, घाडीगावकर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर व मान्यवरांची उपस्थिती.
मसुरे | प्रतिनिधी : क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा दादर, मुंबई येथे नुकताच उपवर आणि वधू व त्यांचे पालक यांचा परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याची सुरूवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून घाडीगावकर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर यांनी उपस्थित वधू - वरांना संबोधित केले.
अध्यक्ष घनश्याम गावकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना समाजाच्या मागील २२ वर्षांतील कार्याचा आढावा घेतला आणि वधुवर सूचक समिती अध्यक्ष विकास घाडीगावकर यांनी वधू - वरांचे परिचय करून दिले.
यावेळी दर्शना घाडी, आर्या घाडी, रश्मी घाडीगावकर, रामचंद्र घाडीगावकर, अनघा गावकर, रघुनाथ घाडीगावकर, संतोष घाडीगावकर, मोहन कुळकर, संदीप घाडी, अभिजित घाडी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. या मेळाव्यासाठी वधू वर व पालक, ज्येष्ठ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकास शिवराम घाडी यांनी सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख करून दिली तर मध्य मुंबई विभागाचे अध्यक्ष नंदकुमार घाडीगावकर यांनी आभार प्रदर्शन केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात.
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्सा...