हेरिटेज टूर गाईड प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत १९ फेब्रुवारी रोजी 'मालवणचा हेरिटेज वॉक.'
हेरिटेज टूर गाईड प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत १९ फेब्रुवारी रोजी 'मालवणचा हेरिटेज वॉक.'
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व लेखाशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम.
इतिहास तज्ज्ञ डॉ. ज्योती बुवा तोरस्कर तसेच पर्यटन तज्ज्ञ श्री. गुरुनाथ राणे यांच्या उपस्थितीची
अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ. सुमेधा नाईक, प्राचार्य डॉ. कैलास राबते यांची माहिती.
मालवण | सानिका वायंगणकर : मालवण शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यासाठी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व लेखाशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हेरिटेज टूर गाईड प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत मालवण शहरात अधिकृत हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे. हा हेरिटेज वॉक, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ,'डोंगुर्ला तलाव – कोपर ढोपर पॉईंट – मोरयाचा धोंडा' या ऐतिहासिक मार्गावर संपन्न होत आहे. या माध्यमातून सहभागींना मालवणच्या समृद्ध इतिहास, सांस्कृतिक परंपरा व स्थानिक वारशाची सखोल माहिती देण्यात येणार आहे.
या हेरिटेज वॉकसाठी इतिहास तज्ज्ञ डॉ. ज्योती बुवा तोरस्कर तसेच पर्यटन तज्ज्ञ श्री. गुरुनाथ राणे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विविध स्थळांचे ऐतिहासिक, सामाजिक व पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व समजावून सांगणार आहेत.
मालवण शहरात प्रथमच अधिकृत स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक वारसा संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होण्यासोबतच मालवणच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या उपक्रमात हेरिटेज टूर गाईड कोर्स मधील सर्व प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत.
या उपक्रमाबाबतची माहिती या अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ. सुमेधा नाईक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास राबते यांनी दिली.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन सप्ताह सांगता समारंभ प्रसंगी वीरांगना वेशभूषा स्पर्धा उत्साहात..
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.