ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मालवणात ‘हेरिटेज टूर गाईड’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाद्वारे १८ वर्षांवरील विद्यार्थी, पर्यटन व्यावसायिक, पर्यटन संस्थांचे सदस्य, होमस्टे व हॉटेल चालक, कर्मचारी तसेच रिक्षा व कार चालकांसाठी अभ्यासक्रम खुला.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणात ‘हेरिटेज टूर गाईड’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाद्वारे १८ वर्षांवरील विद्यार्थी, पर्यटन व्यावसायिक, पर्यटन संस्थांचे सदस्य, होमस्टे व हॉटेल चालक, कर्मचारी तसेच रिक्षा व कार चालकांसाठी अभ्यासक्रम खुला.

मालवणात ‘हेरिटेज टूर गाईड’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाद्वारे १८ वर्षांवरील विद्यार्थी, पर्यटन व्यावसायिक, पर्यटन संस्थांचे सदस्य, होमस्टे व हॉटेल चालक, कर्मचारी तसेच रिक्षा व कार चालकांसाठी अभ्यासक्रम खुला.


Article image


स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे पुणे येथील प्रा. पिसोळकर मार्गदर्शन करणार.


कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर व प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांचे इच्छुकांना लाभ घ्यायचे आवाहन ; प्रा. डाॅ. सुमेधा नाईक यांची माहिती. 


मालवण | प्रतिनिधी : किल्ले सिंधुदुर्गला 'मराठा मिलिटरी लॅण्डस्केप ऑफ इंडिया', या नामांकनामुळे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून नुकतेच मानांकन मिळाले. त्यामुळे मालवण व परिसरातील युवक, विद्यार्थी आणि पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिकांना आपल्या गावाचा इतिहास व वारसा पर्यटकांपर्यंत पोहोचवून अर्थार्जन करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली. ही संधी लक्षात घेऊन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने दिनांक ११ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘हेरिटेज टूर गाईड’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी पुण्याचे प्रा. डॉ. योगेश पिसोळकर मार्गदर्शन करणार असून ते गेली ३० वर्षे मालवण व परिसराच्या इतिहासाचा अभ्यास करत आहेत. 


या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून 'वारसा पर्यटन' यातील संधी, मार्गदर्शन कौशल्ये आणि प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीच्या शक्यता याविषयी सखोल माहिती दिली जाणार आहे. 


सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण परिसराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. मराठा आरमाराचा इतिहास, किल्ले, मंदिरे, लोककला, खाद्यसंस्कृती व सागरी परंपरा यांमुळे हा परिसर जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे ओळखला जात आहे. हा वारसा प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रशिक्षित हेरिटेज टूर गाईडची गरज लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याविषयी स.  का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रा. डाॅ. सुमेधा नाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 


अभ्यासक्रमामध्ये हेरिटेज वॉकसाठी आवश्यक कौशल्ये, वारसा स्थळांचे व्यवस्थापन, प्रत्यक्ष भेटी, स्थानिक इतिहासाची माहिती तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील संवाद कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १८ वर्षांवरील विद्यार्थी, पर्यटन व्यावसायिक, पर्यटन संस्थांचे सदस्य, होमस्टे व हॉटेल चालक, कर्मचारी तसेच रिक्षा व कार चालकांसाठी हा अभ्यासक्रम खुला आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वयंरोजगाराच्या संधी, पर्यटन क्षेत्रातील रोजगार तसेच हॉटेल व पर्यटन व्यावसायिकांशी टाय-अपच्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अभ्यासक्रमाचे शुल्क ₹ १,००० असून अधिक माहितीसाठी डॉ. सुमेधा नाईक (९४०४९२४६७८), गुरुनाथ राणे (९४२०२००९९१) व कृतिका न्हिवेकर (९७६४३५८७०९) यांच्याशी संपर्क साधावा.


सिंधुदुर्गच्या वारशाचे जतन व संवर्धन तसेच पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी इच्छुकांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर व प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स