ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन सप्ताह सांगता समारंभ प्रसंगी वीरांगना वेशभूषा स्पर्धा उत्साहात..
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन सप्ताह सांगता समारंभ प्रसंगी वीरांगना वेशभूषा स्पर्धा उत्साहात..

सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन सप्ताह सांगता समारंभ प्रसंगी वीरांगना वेशभूषा स्पर्धा उत्साहात. 


कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम मिताली मसुरकर तर खुल्या गटात प्रथम मिताली कोरगांवकर. 


मालवण : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ मालवण संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने पर्यटन सप्ताह २०२५ - २६ निमित्ताने महिला विकास कक्ष व सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने 'वीरांगना भारतातील शूर स्त्री योद्ध्या' वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली. भारतीय इतिहासातील किल्ल्यांशी निगडित अनेक स्त्रियांनी शौर्य, त्याग आणि पराक्रमाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयातील कै. नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.


यावेळी व्यासपीठावर कोमसाप केंद्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक तज्ञ वैशाली पंडित यांच्यासह किल्ले प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे, टॅक्स कन्सल्टंट हेमंत वालकर, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, स्वराज्य ढोल पथकाच्या संस्थापक शिल्पा खोत, नाट्य कलावंत शुभदा टिकम, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. उज्वला सामंत उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर पर्यटन सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या 'किल्ले वाळूशिल्प' स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. यावेळी किल्ले प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे व स्वराज्य ढोल पथक संस्थापक सौ. शिल्पा खोत यांनी मनोगत व्यक्त केले. 

Article image


कनिष्ठ महाविद्यालयीन गटात उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक सृष्टी कुमठेकर, उत्तेजनार्थ द्वितीय गार्गी मालवणकर, तृतीय संचिता बागडे, द्वितीय मैथिली गावडे व प्रथम पारितोषिक मिताली मसुरकर यांना प्राप्त झाले. तर खुल्या गटात उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक अर्चिता राणे, उत्तेजनार्थ द्वितीय स्नेहल चव्हाण, तृतीय जान्हवी परुळेकर, द्वितीय श्रावणी गावडे व प्रथम पारितोषिक मिताली कोरगांवकर यांना प्राप्त झाले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच गिरीजा परुळेकर या छोट्या बालिकेने स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल विशेष बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास अभ्यासक तज्ञ वैशाली पंडित व नाट्य कलावंत शुभदा टिकम यांची उपस्थिती लाभली.

Article image  

Article image


यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, समन्वयक डॉ. उज्वला सामंत, आय. क्यू. ए. सी. प्रमुख डॉ. सुमेधा नाईक, प्रा. प्रमोद खरात, डाॅ. एच. एम. चौगले, डॉ. एम. आर. खोत, डॉ. देविदास हारगिले, प्रा. स्नेहा बर्वे, अन्वेषा कदम, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक - कर्मचारी वर्ग तसेच सौ. शिल्पा खोत, श्रावण गवळी, अस्मिता रावराणे, शांती तोंडवळकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. उज्वला सामंत यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले.

Article image


परीक्षक द्वयीने स्पर्धा आयोजनाची प्रशंसा केली व समाधान व्यक्त केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स