ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
सिंधुदुर्ग गाबीत समाजातर्फे नवनिर्वाचित नगरसेवक, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

सिंधुदुर्ग गाबीत समाजातर्फे नवनिर्वाचित नगरसेवक, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार.

सिंधुदुर्ग गाबीत समाजातर्फे नवनिर्वाचित नगरसेवक, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील धुरीवाड्यातल्या संस्कार हाॅल सभागृहात, गाबीत समाज, सिंधुदुर्गतर्फे गाबीत समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर, कार्याध्यक्ष रतनकुमार झाजम, गाबीत समाज जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, कार्याध्यक्ष हरी खोबरेकर, सरचिटणीस महेंद्र पराडकर, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक सुदेश आचरेकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी उपसभापती विलास ताम्हणकर, जिल्हा मच्छीमार सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, वेंगुर्ल्याचे मच्छीमार नेते वसंत तांडेल, शिरोडा विभागाचे बाबा नाईक, उद्योजक लक्ष्मीकांत खोबरेकर, देवगडचे सरचिटणीस लक्ष्मण तारी, उपाध्यक्ष रमेश तारी, महिला बालविकास सभापती अन्वेषा आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी नवनिर्वाचित विद्यमान नगरसेवक तसेच माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, नगरसेविका मेघा गावकर, रेडी पंचायत समिती सदस्या सौ. प्रियांका घाटवळ यांना सन्मानित करण्यात आले.


स्विकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांचा सत्कार त्यांच्या पत्नी ज्योती तोरसकर यांनी, तर मुंबईच्या नगरसेविका शिल्पा केळुसकर यांचा सत्कार त्यांचे सासरे आबा केळुसकर यांनी स्वीकारला. जिल्हा बँकेत संचालक मेघनाद धुरी यांचाही सत्कार करण्यात आला.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिका व पंचायत समितीमध्ये निवडून आलेले गाबीत समाजातील नगराध्यक्ष, नगरसेवक व सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी काम करावे. निवडून आलेल्या सदस्यांनी गाबीत समाजाच्या उत्कर्षासाठी आपल्या राजकीय ताकदीचा उपयोग करावा. राजकारणात गाबीत समाजाची ताकद व प्रभाव वाढला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले.


जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ले व देवगडच्या किनारी भागात गाबीत समाजाची मोठी वस्ती आहे. जेथे गाबीत समाजाचे मोठे वास्तव्य आहे तेथे निवडणुकांमध्ये समाजाचे प्राबल्य असणे महत्वाचे आहे. निवडणुकांमध्ये एकजुटीने समाजाने आपली ताकद दाखविली पाहिजे. आज किनारपट्टीवरील मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांना बांधकामविषयक नोटिसा प्रशासनाकडून आल्या आहेत. हे सर्व गाबीत बांधवच असून नोटिसांविरुद्धच्या लढ्यात आपण गाबीत समाज म्हणून एकत्र येऊन आवाज उठविला पाहिजे, यासाठी गाबीत समाज संघाचे सहकार्य लाभेल, असेही ते म्हणाले.


यावेळी उपस्थितांनी नवनिर्वाचित सदस्य व नगरसेवक यांना शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्तींनी समाजाकडून झालेल्या सत्काराने आपण भारावून गेलो असल्याच्या भावना व्यक्त करत समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.


यावेळी श्रमजीवी रापण संघाचे अध्यक्ष दिलीप घारे, पारंपरिक मच्छीमार संघटनेचे नेते बाबी जोगी, मालवण गाबीत समाजाचे खजिनदार मिथुन मालंडकर, सदस्य पवनकुमार पराडकर, राधिका कुबल, दीक्षा ढोके, अनुष्का मालंडकर, केरकर बंधू, अतुल मालंडकर, शेलटकर, पूजा सरकारे, गाबीत समाज कार्यकर्ते संजय केळुसकर, केतन जोशी असे समाज बांधव उपस्थित होते.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स