मालवणात नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांची नाट्यगृहाची नगरसेवक व प्रशासनासह पहाणी.
मालवणात नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांची नाट्यगृहाची नगरसेवक व प्रशासनासह पहाणी.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, पदाधिकारी आणि नगरपरिषद अधिकारी उपस्थित.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून दर्जेदार सुविधा दिल्या जाणार असल्याची माहिती.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह येथे नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगरसेवक व प्रशासना सोबत पाहाणी केली. या पहाणी दरम्यान नाट्यगृह देखभाल दुरुस्ती व सुविधा दृष्टीने आवश्यक सूचना प्रशासनाला करण्यात आल्या.
दरम्यान, गेल्या काही वर्षात नाट्यगृहात असुविधा निर्माण झाल्या. मात्र दर्जेदार नाट्यगृह असावे या दृष्टीने असुविधा दूर केल्या जातील. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून नाट्यगृहात अधिकाधिक सुविधा निर्माण केल्या जातील अशी माहिती नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका अनिता गिरकर, नगरसेवक मंदार ओरसकर यांच्यासह पालिका अधिकारी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
नाट्यगृहात सुविधा वाढवण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात नियोजन सुरु आहे. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी माहिती दिली.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंताना सरकार दरबारी न्याय मिळवून दिल्याची दशावतार कलावंतांची प्रतिक्रिया.
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंता...
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांची मागणी आणि जिल्ह्यात दशावतार कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातले अधिकारी दाखल