हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार श्री. अमित खोत.. !
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार श्री. अमित खोत.. !
गुढीपाडव्याला आयोजित यात्रेचे यंदा २३ वे वर्ष.
स्वागत यात्रा समिती संस्थापक श्री. भाऊ सामंत, माजी संयोजक पत्रकार प्रशांत हिंदळेकर, बंटी केनवडेकर, कृष्णा ढोलम, सौगंधराज बादेकर व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत भरड दत्तमंदिर येथे समितीची बैठक संपन्न.
मालवण | ब्यूरो न्यूज : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवणच्या संयोजक पदी पत्रकार अमित खोत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने १९ मार्च गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे भव्यदिव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण शहरातून निघणार आहे. यंदा स्वागत यात्रेचे २३ वे वर्ष आहे.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संस्थापक श्री. भाऊ सामंत व सदस्य यांच्या उपस्थितीत भरड दत्तमंदिर येथे समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी श्री. अमित खोत यांची निवड करण्यात आली.
यावेळी माजी संयोजक श्री. प्रशांत हिंदळेकर, श्री. बंटी केनवडेकर, भूषण साटम, रत्नाकर कोळंबकर, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर, कृष्णा ढोलम, सौगंधराज बादेकर, अरविंद मयेकर, सौ. अमृता फाटक, अस्मिता निव्हेकर यांसह सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
भव्य स्वरूपात चित्ररथ, आकर्षक चलचित्र देखावे, ढोलपथक, वेशभूषा स्पर्धक आणि तमाम मालवण वासीय यांच्या सहभागातून भगव्या उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा गुढीपाडव्याच्या संध्याकाळी निघणार आहे. यावेळी त्या दृष्टीने नियोजन व प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे.
भरड दत्त मंदिर येथे पुढील महत्वपूर्ण बैठक शुक्रवार २७ फेब्रुवारी संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने देण्यात आली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...