ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
राष्ट्रीय महामार्ग - ६६ वर स्लीपर बस विशेष तपासणी मोहीम.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

राष्ट्रीय महामार्ग - ६६ वर स्लीपर बस विशेष तपासणी मोहीम.

प्रकाशन: 20 Feb 2026 09:08 PM
वाचन संख्या 192

राष्ट्रीय महामार्ग - ६६ वर स्लीपर बस विशेष तपासणी मोहीम. 


प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा तपासणी मोहीमा नियमीत राबवल्या जाणार असल्याची माहिती.


मसुरे | प्रतिनिधी : उपप्रादेशिक परिवहन विभाग, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत राष्ट्रीय महामार्ग - ६६ वर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्लीपर बसची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे यांच्या नेतृत्वात संपन्न झाली.

Article image


या तपासणीदरम्यान स्लीपर बसमधील परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, कर भरणा, चालक परवाना आदी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन मार्ग सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. तसेच अग्निशामक यंत्रणेची उपलब्धता व ती कार्यक्षम स्थितीत असल्याची तपासणी करण्यात आली. स्लीपर केबिनमधील सुरक्षा नियमांचे पालन होत असल्याचीही पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधित वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.


या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे, संकेत सोमणाचे, पराग मातोंडकर, प्रीतम जाधव यांचा सहभाग होता तर चालक सिद्धाराम स्वामी व रामदास पाखरे यांनी सहकार्य केले. 


प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असून सर्व वाहनचालक व मालकांनी वाहतूक तसेच सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स