ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
नारी सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित..!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

नारी सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित..!

प्रकाशन: 20 Feb 2026 03:56 PM
वाचन संख्या 218

नारी सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित..!

Article image

लव्ह जिहाद बाबत मालवण तहसीलदार कार्यालयात निवेदन.


मालवण : मालवण तहसीलदार श्री. गणेश लवे यांच्याकडे, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने लव्ह जिहाद बाबत निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्रात हिंदू भगिनींच्या रक्षणासाठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर कठोर आणि अजामीनपात्र 'लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी कायदा' येत्या अधिवेशनात तात्काळ संमत करण्याबाबत हे निवेदन असल्याची माहिती मिळत आहे. 


गेल्या दिड - दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' आणि 'अवैध धर्मांतर' या गंभीर समस्यांविरोधात सकल हिंदू समाज, हिंदु जनजागृती समिती आणि विविध महिला संघटनांनी एकत्रित येत प्रचंड जनआक्रोश मोर्चे काढले. या मोर्चामध्ये राज्यातील लाखो माता-भगिनी आणि हिंदू बांधव रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी सरकारने या विषयाचे गांभीर्य ओळखून 'लव्ह जिहाद' विरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजही दुर्दैवाने या घटना थांबलेल्या नाहीत, उलट त्यांची तीव्रता आणि क्रूरता वाढतच चालली आहे असे या निवेदनात नमूद केले आहे. 


या निवेदनात, 'लव्ह जिहाद' हे केवळ प्रेमाचे नाटक नसून, ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध असून, यामध्ये हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यांचे धर्मांतर करणे, लैंगिक शोषण करणे, दहशतवादासाठी वापरणे आणि विरोध केल्यास त्यांची निघृण हत्या करणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत असा आरोप हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे 


महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे, जिथे परस्त्रीला मातेसमान मानले जाते. परंतु, आज त्याच महाराष्ट्रात हजारो हिंदू मुली 'लव्ह जिहाद'च्या बळी ठरत आहेत असेही निवेदनात नमूद केलेले आहे. 


वर्ष २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण या गंभीर विषयावर चर्चा करून कठोर कायदा संमत करावा, अशीही आग्रही मागणी निवेदनात केलेली आहे. 


निवेदनात, 'जर नारी सुरक्षित राहिली, तरच राष्ट्र सुरक्षित राहील' असे विशेष नमूद करून हिंदू समाजाने संयम बाळगून अनेक मोर्चे काढले, निवेदने दिली. आता सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. या अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्राला 'लव्ह जिहाद मुक्त' करावे, हीच आमची अपेक्षा आहे असे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे सांगितले गेले आहे  


हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हे निवेदन दिले गेले आणि त्यावेळी श्री. रत्नाकर कोळंबकर, दीनानाथ गावडे, किर्ती नाचणोलकर, रिमा कामत, साक्षी मयेकर , शांती तोंडवळकर, शिल्पा खोत, गौरी गवाणकर, अमृता फाटक, जान्हवी चव्हाण उपस्थित होते. 


समाजसेविका सौ. शिल्पा खोत व श्री. अनिकेत फाटक यांनी या निवेदनाबाबत माहिती दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 282

लोकप्रिय टॅग्स