ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवण नगरपरिषद समोरील रस्त्याच्या साईड पट्टीचे काम सुरू.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण नगरपरिषद समोरील रस्त्याच्या साईड पट्टीचे काम सुरू.

प्रकाशन: 18 Feb 2026 11:47 PM
वाचन संख्या 71

मालवण नगरपरिषद समोरील रस्त्याच्या साईड पट्टीचे काम सुरू. 

Article image

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी वेधले होते संबंधित विभागाचे लक्ष.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत, मालवण नगरपरिषद समोरील मालवण कसाल मुख्य रस्त्याची साईड पट्टी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याबाबत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. 


उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालयाचे लक्ष वेधत, या रस्त्याची 'साईड पट्टी' करून रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी केली होती. याची दखल घेत बांधकाम विभागाने काम सुरू केले. याबाबत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजित पाटील यांचे आभार मानले आहेत. 


खासदार नारायण राणे यांच्या शिकवणीनुसार, जनहिताची कामे तातडीने आणि प्राधान्याने केली पाहिजेत. त्यानुसार आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मालवण शहराच्या विकासासाठी व जनसेवेसाठी कटिबद्द असल्याचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी याबाबत सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स