ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
सिंधुदुर्ग कॉलेजच्या एन. सी. सी. छात्रांचा निरोप समारंभ संपन्न.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

सिंधुदुर्ग कॉलेजच्या एन. सी. सी. छात्रांचा निरोप समारंभ संपन्न.

प्रकाशन: 19 Feb 2026 12:19 AM
वाचन संख्या 76

सिंधुदुर्ग कॉलेजच्या एन. सी. सी. छात्रांचा निरोप समारंभ संपन्न. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातल्या एन सी. सी. विभागातील तिसऱ्या तृतीय वर्ष एनसीसी छात्र तथा विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचे अर्थशास्त्राचे प्रा. पवन बांदेकर उपस्थित होते. 

Article image

Article image


यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग महाविद्यालय एन. सी. सी. मध्ये अग्रेसर असल्याबाबतची कारणमीमांसा करत माहिती दिली आणि प्रमुख पाहुणे श्री. बांदेकर यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.



यावेळी पोलिस निरीक्षक मारुती जगताप, तहसीलदार गणेश लव्हे तसेच कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव गणेश कुशे, सहसचिव संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, संचालक ॲड. समीर गवाणकर, डाॅ. शशिकांत झांटये, डॉ. रामचंद्र काटकर, महादेव पाटकर, राजेंद्र खांडाळेकर, शैलेश पावसकर, माजी संचालक प्रमोद ओरसकर, भाऊ सामंत, विजय केनवडेकर, डॉ. पंकज दिघे, हॉटेल व्यावसायिक संजय गावडे व संस्था पदाधिकारी यांनी एनसीसी छात्रांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  


यावेळी श्री. खोबरे श्री. साळुंखे, रोहिणी फाटक, सौ. कदम, सूर्यकांत कदम, प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. 

Article image

कार्यक्रमासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र व एनसीसी विभाग प्रमुख लेफ्ट. प्रा. मल्लेश खोत यांच्या सक्रीय मार्गदर्शनाखाली प्रथम व द्वितीय वर्ष एन. सी. सी. छात्रांनी योगदान दिले.


यावेळी विद्यार्थ्यांनी, मनोगतांद्वारे एन. सी.सी. मुळे देश सेवा करायला मिळाली व यापुढेही अशाच प्रकारची देश सेवा करू असे सांगितले. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स