ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते पोईप येथील प्रशालेच्या वर्ग खोल्यांचे भूमिपूजन.

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते पोईप येथील प्रशालेच्या वर्ग खोल्यांचे भूमिपूजन.

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते पोईप येथील प्रशालेच्या वर्ग खोल्यांचे भूमिपूजन.

Article image


खासदार नारायणराव राणे यांच्या निधीतून प्रशालेला मंजूर वर्गखोल्या.

Article image


पोईप : शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांच्या हस्ते, मालवण तालुक्यातील पोईप येथील वर्दम हायस्कूल प्रशालेसाठी खासदार नारायणराव राणे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सहा वर्गखोल्यांचे भूमीपुजन नुकतेच, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. 


यावेळी वर्दम हायस्कूलच्या १० वी मधील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सह पोईप वर्दम हायस्कूल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कांदळकर, सौ. सुमेधा पाताडे, संतोष साटविलकर, अक्षता गावडे, संजय ठाकूर, प्रज्ञा चव्हाण, संतोष गावडे तसेच मालवण तालुका प्रमुख मंदार लुडबे, तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम, सरपंच पोईप श्रीधर नाईक, महेंद्र पालव, विश्वनाथ पालव, श्रीकृष्ण तेली, बबलु वेंगुर्लेकर, राजु गावडे, रामचंद्र सातार्डेकर, दया देसाई, विलास माधव, संदिप सावंत, भाऊ चव्हाण, बाबुराव चिरमुले, महेश पालव, चांदोस्कर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते, विद्यार्थी पालक, विद्यार्थी, शिक्षक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.


मान्यवरांनी, इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पुढील शैक्षणिक क्षेत्रात चमकून आईवडिलांचे व प्रशालेचे नाव मोठे करावे असे आवाहन केले तर पोईप वर्दम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज च्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर आणि व्यवस्थापकीय संचालक समिती यांनी आजवर घेतलेले परिश्रम आणि शैक्षणिक कार्य कौतुकास्पद आहे अशी प्रशंसा केली. शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता, विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उत्तम प्रकारच्या उपलब्ध करून देण्यात व दरवर्षी १००%निकालाची परंपरा असलेल्या या प्रशालेचे नाव संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आघाडीवर आहे याचा आपल्याला अभिमान आहे असे विशेष उद्गार जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी काढले. 



नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार.

Article image


पोईप प्रशालेतील कार्यक्रमाचे औचित्य साधून नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या पोईप सुकळवाड, पेंडूर, मसुरे मतदार संघातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार दत्ता सामंत, संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 


यामध्ये सुकळवाड मतदार संघातील जि. प. सदस्या सौ. सुमेधा पाताडे, पं. स. सदस्या सौ प्रज्ञा चव्हाण, पेंडूर जि. प. मतदार संघातील जि प. सदस्य संतोष साटविलकर, सुकळवाड पं. स. सदस्य संतोष गावडे वायरी भंतनाथ सदस्या सौ अक्षता गावडे, मसुरे पं.स. सदस्य संजय ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी,  महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करुन जिल्हा परिषद पंचायत समिती वर सत्ता मिळवून दिल्या बद्दल सर्वांचे जाहीर आभार मानले तसेच निवडून आलेल्या जि. प. व पं स. सदस्यांचे सत्काराबद्दल विशेष अभिनंदन करून आपण जनतेचे सेवक आहोत या भावनेतून आपापल्या मतदारसंघात विकासकामे करुन आपल्यावर जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी लावावी असे आवाहन करीत त्यांना पुढील सशक्त वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


पोईप | संजय माने ( प्रतिनिधी)

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आ...

31 Aug 2026 516

लोकप्रिय टॅग्स