ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाचे निरीक्षक अजय हिर्लेकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन अजय शिंदे यांच्याशी चर्चा.




Article image




सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासद व निवृत्त सभासदांच्या न्यायहक्कासाठीचा लढा.



सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढीतील सभासद व निवृत्त सभासदांच्या न्यायहक्कासाठी सुरू असलेल्या लढ्याला रविवारी महत्त्वपूर्ण वळण मिळाले. निवृत्त सभासदाच्या हक्काच्या रकमेतून करण्यात आलेल्या कथित कपातीच्या निषेधार्थ या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा, या मागणीसाठी अजय मधुकर शिंदे यांनी रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून पतपेढी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

Article image

या उपोषणाला पतपेढी सभासद मित्र परिवारातील दोनशेहून अधिक सभासदांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शविला. सभासदांच्या हक्कांच्या प्रश्नावर सुरू झालेल्या या आंदोलनाला त्यामुळे व्यापक पाठिंबा मिळाला.

Article image


दरम्यान, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाचे निरीक्षक अजय हिर्लेकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन अजय शिंदे यांच्याशी चर्चा केली. संबंधित प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच सुनावणीच्या माध्यमातून प्रकरणावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी उपोषणकर्ते अजय शिंदे यांना केली.

Article image


यानंतर भारतीय जनता पार्टीचे कुडाळ तालुकाध्यक्ष भाई सावंत यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्याशी दूरध्वनीवरून अजय शिंदे यांचा संवाद साधून दिला. पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Article image

भाई सावंत यांनी सरबत देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. ही विनंती अजय शिंदे यांनी मान्य केली आणि उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतर अजय शिंदे यांनी भाई सावंत यांच्यासह कणकवली येथील निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी संबंधित प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा करून सभासदांच्या न्यायहक्कासाठी कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.


निवृत्त सभासद अजय मधुकर शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, ते पतपेढीचे नियमित सभासद असून नियत वयोमानानुसार ३१/८/२०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी नियमानुसार पतपेढीकडे सभासदत्वाचा राजीनामा सादर केला होता आणि तो कार्यकारिणीने मंजूर केला होता.


मात्र, सेवानिवृत्तीनंतर देय असलेल्या रकमेतून सुमारे ₹४,८१,११४/- इतकी रक्कम कथितरित्या कपात करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. संबंधित प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असतानाही अंतिम निर्णय होण्यापूर्वी ही रक्कम कपात करण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. ही कपात कोणत्या कायदेशीर तरतुदी, संस्थेच्या उपविधी, ठराव अथवा आदेशाच्या आधारे करण्यात आली, याची माहिती देण्यात यावी. तसेच संबंधित सभासदाला नोटीस, कारणे दाखवा नोटीस अथवा सुनावणीची संधी देण्यात आली होती का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयाकडून दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित पतपेढीला पत्र देऊन चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.


कपात कोणत्या कायदेशीर तरतुदीच्या आधारे करण्यात आली, संबंधित न्यायालयीन प्रकरणाची पार्श्वभूमी, तसेच तक्रारदारास देण्यात आलेली नोटीस व सुनावणीची संधी याबाबत तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


कपात अथवा वसुली बेकायदेशीर किंवा नियमबाह्य असल्याचे चौकशीत आढळल्यास संबंधित ₹४,८१,११४/- रक्कम परत करण्याची तसेच लागू असल्यास योग्य व्याज देण्याची कार्यवाही करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.


अजय शिंदे यांनी यासंदर्भात सांगितले आहे कीञहा संघर्ष केवळ वैयक्तिक प्रश्न नसून प्रत्येक सभासदाच्या न्यायहक्काशी संबंधित असल्याची भूमिका मांडली आहे. निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम ही सभासदाच्या पुढील आयुष्याचा आर्थिक आधार असते. त्यामुळे अशा रकमेतून कोणतीही कपात होत असल्यास ती नियम, उपविधी व कायदेशीर प्रक्रियेच्या चौकटीतच झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.


संस्थेच्या कारभारात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सभासदांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. कोणत्याही सभासदावर अन्याय झाल्यास त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी सभासदांनी एकजूट दाखविणे गरजेचे आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.



या उपोषणादरम्यान पतपेढी सभासद मित्र परिवारातील दोनशेहून अधिक सभासदांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. सभासदांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मिळालेला हा प्रतिसाद महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


पालकमंत्री नितेश राणे यांच्या आश्वासनासोबतच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे निरीक्षक अजय हिर्लेकर यांनी लवकर सुनावणी घेण्याचे दिलेले आश्वासन यामुळे उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. मात्र, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष सुनावणी होऊन सभासदाला न्याय मिळणे हीच पुढील प्रमुख अपेक्षा असल्याचे अजय शिंदे यांनी स्पष्ट केले.


पालकमंत्री नितेश राणे यांच्या भेटीदरम्यान, शिष्टमंडळात अजय शिंदे, विजय मागाडे, मुरलीधर वडगुले, गोपाळ हरमलकर, संजय परब, विजय मयेकर, अशोक गिते, सुदीन पेडणेकर, अर्जुन माळी, सारिका शिंदे आणि शिवराम सावंत यांचा समावेश होता.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स