ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंतीचे आयोजन.

शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंतीचे आयोजन.

शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंतीचे आयोजन. 


कुडाळ - मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती. 


मालवण : शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात सकाळी ९:०० वाजता कुडाळ - मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव संपन्न होणार आहे.


या उत्सवासाठी, मालवण बंदर जेटी येथे मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक व शिवप्रेमी यांनी सकाळी ९:०० वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख मंदार लुडबे, विनायक बाईत, मधुरा तुळसकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, मालवण न. प. नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, अभी लाड व शहर संघटक राजू बिडये यांनी केले आहे. श्री. कमलाकर उर्फ भाई मांजरेकर यांनी सामाजिक मंचावरील डिजीटल संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स