आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार.
आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार.
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,
पदाधिकारी, मान्यवर उपस्थित.
मालवण | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा मुंबई वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते मालवण येथे सत्कार करण्यात आला .
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका मेघा गावकर, नगरसेविका भाग्यश्री मयेकर तसेच जिल्हा परिषद सदस्य दिपक नारकर, दादा साईल, रुपेश कानडे, दीपलक्ष्मी पडते, निखिल कांदळकर यांसह कुडाळ मालवण लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)