रोटरी क्लब मालवणच्या वतीने २६ फेब्रुवारीला तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धा.
रोटरी क्लब मालवणच्या वतीने २६ फेब्रुवारीला तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धा.
मराठी भाषा दिवसाचे औचित्य.
मालवण | सानिका वायंगणकर : मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवण यांच्या वतीने, २६ फेब्रुवारीला तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना खुली असून सहभागींसाठी लेखणी, कागद व मजकूर आयोजकांकडून पुरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा, मालवणच्या कन्याशाळेत २६ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना चषक तसेच रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
ह्या स्पर्धेला तालुक्यातील नागरिकांनाही उपस्थितीचे विशेष आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या नाव नोंदणीची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२६ असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नांव नोंदणी साठी 'लिमये हॉस्पिटल' संपर्क क्रमांक 02365 - 252266 अथवा 7057906681 या क्रमांकांवर संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)